श्वसनलिकेत अडकला शेंगदाणा, अडीच वर्षांच्या सृष्टीचा गुदमरून मृत्यू

श्वसनलिकेत अडकला शेंगदाणा, अडीच वर्षांच्या सृष्टीचा गुदमरून मृत्यू

शेंगदाणे खात असताना ठसका लागून अडीच वर्षांच्या चिमुरडीचा श्वास कोंडून मृत्यू झाला. सृष्टी ठाकरे असे मृत मुलीचे नाव आहे

  • Share this:

दीपक बोरसे (प्रतिनिधी),

धुळे,27 फेब्रुवारी:शेंगदाणे खात असताना ठसका लागून अडीच वर्षांच्या चिमुरडीचा श्वास कोंडून मृत्यू झाला. सृष्टी ठाकरे असे मृत मुलीचे नाव आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरातील सोनवणे नगर परिसरात ही घटना घडली आहे.

सृष्टी ही चिमुरडी घरी शेंगदाणे खात होती. त्यातच तिला ठसका आला. शेंगदाणा थेट सृष्टीच्या श्वासनलिकेत अडकला. सृष्टीला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार आधीच तिचा मृत्यू झाला होता. श्वासनलिकेत शेंगदाणा अडकल्यामुळे सृष्टीचा जीव गुदमरला आणि त्यातच तिचा मृत्यू झाला. सृष्टीची आई शिरपूर बस आगारातील वाहक म्हणून कार्यरत आहे. शेंगदाणे खात असताना सृष्टीचा जीव गुदमुरल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.

सुट्टीवर आलेल्या जवानाने केली पत्नीची हत्या, दोन वर्षांपूर्वी झाला होता प्रेम विवाह

याबाबत मिळालेली माहिती अशी की, लक्ष्मी भरत ठाकरे या परिवारासह शहरातील करवंद नाक्याजवळील सोनवणे नगरात राहतात. त्यांचे पती भरत यादव ठाकरे हे सटाणा तालुक्यातील पोफेरझळ येथे शेतीकाम करतात. दरम्यान, लक्ष्मी या घरी असताना त्यांची अडीच वर्षाची मुलगी सृष्टी ही शेंगदाणे खात होती. तिला अचानक ठसका लागला. ठसका लागल्याने सृष्टीला जीव गुदमरून श्वासोश्वास घेण्यास तिला त्रास होवू लागल्याचे लक्ष्मी यांच्या लक्षात आले. त्यांनी सृष्टीला तातडीने शिरपूर उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत सृष्टीचा श्वासोश्वास पूर्णपणे थांबला होता. डॉक्टरांनी सृष्टीला मृत घोषित केले. या घटनेनंतर संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मराठी दिनी राज ठाकरे यांनी शेअर केला काश्मिरी तरुणीचा VIDEO; काश्मिरीयतने केला मराठी आदर

First published: February 27, 2020, 4:59 PM IST

ताज्या बातम्या