मुंबई, 27 ऑक्टोबर : मागच्या तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेकडून निवडून आलेले एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार फुटले. यानंतर या 40 आमदारांनी भाजपला साथ देत महाविकास आघाडीला सत्तेतून पायउतार केलं. दरम्यान यामध्ये उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. तसेच शिवसेनेच्या धनुष्यबाणावर शिंदे गटाकडून दावा करण्यात आला. यानंतर बीकेसी येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत दसऱ्या दिवशी झालेल्या मेळाव्याला उद्धव ठाकरे यांचे बंधु जयदेव ठाकरे हजर राहिल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. यासगळ्या सत्ता नाट्यात जयदेव ठाकरेंनी आपल्या कुंचल्यातून काढलेले एकनाथ शिंदे यांना शिवधनुष्य भेट दिले आहे. यावरून जोरदार चर्चा रंगली आहे.
जयदेव ठाकरे यांच्या पत्नी अनुराधा ठाकरे यांनी वर्षा निवास्थानी दाखल होत. अनुराधा ठाकरे यांनी जयदेव ठाकरेंच्या कुंचल्यातून साकारलेलं शिवधनुष्य मुख्यमंत्र्यांना भेट दिले. त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या भेटीमागे अनेतर तर्क वितर्क लावण्यात येत आहेत. याचबरोबर दोनदिवसांपूर्वी, शिवसेनेचं मूळ चिन्ह ‘धनुष्यबाण’ हे अर्थातच शिंदे गटाला मिळेल, वक्तव्य बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार ठाकरे यांनी दिली होती.
हे ही वाचा : ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राडा, शाखा ताब्यात घेण्यावरून वाद घटनेचा LIVE VIDEO
दरम्यान, आज जयदेव ठाकरेंच्या कुंचल्यातून साकारलेलं शिवधनुष्य मुख्यमंत्री शिंदे यांना भेट देण्यात आले. जयदेव ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी शिवधनुष्य साकारलं होत अस सांगण्यात येत आहे.
दसऱ्या मेळावा कार्यक्रमात काय म्हणाले होते जयदेव ठाकरे
एकनाथ माझा आवडीचा.. आता ते मुख्यमंत्री झालेत… म्हणून एकनाथराव म्हणतो, मला बरेच फोन येत होते, की तुम्ही शिंदे गटात गेलात का? पण हा ठाकरे कोणाच्या गोठ्यात बांधला जात नाही. एकनाथ शिंदेंच्या दोन चार भूमिका मला आवडल्या. धडाडीचा माणूस आपल्याला हवाय, त्याच्या प्रेमासाठी आलोय, असं जयदेव ठाकरे म्हणाले.
हे ही वाचा : ठाकरे गटाला दिलासा देत उज्जवल निकम यांची निवडणूक आयोगाच्या कारवाईवर टीप्पणी
आपला इतिहास आहे, चिपळ्या वाजवणारा एकनाथ, त्यांना जवळच्यांनी संपवलं. पण यांना (एकनाथ शिंदे) एकटं पाडू नका, एकटा नाथ होऊ देऊ नका, एकनाथ राहू द्या, तुम्हाला विनंती आहे, अशी भावनिक साद जयदेव ठाकरेंनी घातली. हे सगळं बरखास्त करा, पुन्हा निवडणुका घ्या आणि शिंदे राज्य येऊ द्या, असं आवाहनही जयदेव ठाकरे यांनी केलं.