मुंबई, 27 ऑक्टोबर : खरी शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा यावर न्यायालय आणि निवडणूक आयोगासमोर लढा सुरू आहे. पण, ठाकरे गट आणि शिंदे गटातील कार्यकर्ते वेगळ्याच संघर्षाला सामोरे जात आहेत. त्यांच्यातील संघर्षाचा मुद्दा आहे ‘शिवसेना शाखा’. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीमध्ये शहर शाखेवरून मोठा राडा झाला आहे. शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. या वेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता. दरम्यान या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण असल्याने शाखेला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे.
डोंबिवली शहर शाखेवरुन मोठा राडा, मोठ्या संख्येने शिंदे समर्थक डोंबिवली शिवसेना शहर शाखेत , ठाकरे आणि शिंदे समर्थक यांच्यात शाखेवरुन मोठा राडा pic.twitter.com/FousNmqg4E
— News18Lokmat (@News18lokmat) October 27, 2022
मागच्या काही दिवसांपासून ठाण्यात शाखा कार्यालये घेण्यावरून वाद सुरू आहेत. नवी मुंबईतील घटना ताजी असतानाच डोंबिवलीत सध्या शिंदे गट आणि ठाकरे गट आमने सामने आल्यामुळे जोरदार राडा पहायला मिळाला. दरम्यान शिंदे गटाने डोंबिवलीतील शहर शाखा कार्यालयावर अधिकृत ताबा घेतला.
हे ही वाचा : शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; दिवाळी संपताच पुन्हा मोठे प्रशाकीय फेरबदल होणार
दरम्यान शिंदे गटाने कायदेशीर कारवाई करत त्यांनी ताबा घेतल्याने जोरदार राडा झाला. या घटनेची माहिती पोलिसांना समजताच तातडीने पोलीस बंदोबस्त वाढवत पोलिसांनी वाद मिटवला. परंतु वातावरण तणावाचे असल्याने कोणत्याही क्षणी पुन्हा राडा होण्याची शक्यता आहे.
डोबिंवलीमध्ये शिंदे गटाचे वचर्स्व असल्याने मोठ्या संख्येने शिंदे समर्थक डोंबिवली शिवसेना शहर शाखेत आले होते. दरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. यावर पोलीस काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान ठाकरे गटातील पदाधिकारी शिल्पा मोरे या डोंबिवली शहर शाखेवर येताच शिंदे समर्थक महिलांनी त्यांना हुसकावून लावले. यामुळे काही काळ वातावरण तणावाचे बनले होते.
ठाण्यातील कुंभारवाडा शाखेवरूनही जोरदार वाद
ठाणे जिल्ह्यातील कोपरी येथील कुंभारवाडा शाखा ताब्यात घेण्यावरुन शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये आज जोरदार संघर्ष पाहायला मिळाला. या वेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त होता. दोन्ही गटांनी चर्चा आणि संवादाचा मार्ग अनुसरल्यामुळे होणारा संभाव्य राडा टळला. मात्र, दोन्ही गटातील संघर्षाची धग मात्र कायम आहे.
हे ही वाचा : ठाकरे गटाला दिलासा देत उज्जवल निकम यांची निवडणूक आयोगाच्या कारवाईवर टीप्पणी
प्राप्त माहितीनुसार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व मानणारे कार्यकर्ते आज (7 ऑक्टोबर) कुंभारवाडा शाखेत बसले होते. या वेळी शिंदे गटाचे कार्यकर्ते तिथे आले. दोन्ही बाजूंनी सुरुवात चर्चेतून झाली. ही चर्चा पुढे वादावादी आणि बाचाबाचीत बदलली. शिंदे गटातील काही स्थानिकांनी शाखेवर दावा सांगितला. त्यामुळे दोन्ही गटांमध्ये वाद सुरु झाला. पोलिसांनी वेळीच घटनास्थळी धाव घेऊन पोलीस बंदोबस्त वाढवला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. तरीही परिसरात काही काळ तणाव होता.