अविनाश कानडजे (छत्रपती संभाजीनगर), 03 मार्च : छत्रपती संभाजीनगरमध्ये जोरदार अपघात झाल्याची माहितीसमोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोडजवळ हा अपघात झाला आहे. सिल्लोडजवळ एसटी बस आणि सिलेंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात 1 ठार तर 15 ते 20 प्रवाशी गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दरम्यान कोणतेही सिलेंडर फुटले नसल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असणाऱ्या सिल्लोड येथे भीषण अपघात झाला. दरम्यान सिल्लोडहून पाचोराकडे जाणाऱ्या एसटी बसला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. या ट्रकमध्ये गॅस असल्याचे बोलले जात आहे.
राहुल गांधींनी मोदी सरकारच्या दोन योजनांचं केंब्रिज युनिव्हर्सिटीत केलं कौतुक
अपघातात ट्रकमधील सिलेंडर रस्त्यावर पडले मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाल्याने झाला अपघात रस्त्यांवर काचेचा तुकड्यांचा सडा पडला होता. या अपघातात सिलेंडर घेऊन जाणारा ट्रक चालक जागीच ठार झाला आहे. हा अपघात एवढा भीषण होता की ट्रक चालकाचा मृतदेह क्रेनच्या साह्याने बाहेर काढावा लागला.
संभाजीनगरमध्ये गुन्हेगारी वृत्ती वाढली
औरंगाबाद जिल्ह्यात रोडवर शस्त्रांचा धाक दाखवून प्रवाशांना लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात अखेर ग्रामीण पोलिसांना यश आलं आहे. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी कारवाई करत पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या. मात्र या चोरीच्या गुन्ह्यातील दोन आरोपी अंधारांचा फायदा घेऊन फरार झाले. चोरट्यांना अटक करण्यात आली असून, फरार आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, वैजापूर तालुक्यातील शिवराई रोडवर लग्नावरून घरी परतत असलेल्या दोन दाम्पत्यांना अडवून लुटण्यात आले होते. त्यांना मारहाण देखील करण्यात आली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चोरट्यांचा पाठलाग सुरू केला.
शिंदे फडणवीस सरकारला औरंगाबाद खंडपीठाचा दणका; ठाकरेंचे निर्णय रद्द करणे अंगलट
एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी थरारक कारवाई पोलिसांनी केली. पोलिसांनी आरोपींचा दोन किलोमिटरपर्यंत पाठलाग करत त्यांना अटक केली. मात्र यातील दोघे अंधाराचा फायदे घेत फरार झाले. पोलिसांकडून आता फरार आरोपींचा शोध सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Truck accident