मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'मी शिवबंधन एका मिनिटात सोडणार पण अट एकच'....

'मी शिवबंधन एका मिनिटात सोडणार पण अट एकच'....

सुषमा अंधारे

सुषमा अंधारे

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India
  • Published by:  Ajay Deshpande

औरंगाबाद :  ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी पुन्हा एकदा भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मी शिवबंधन एक मिनिटांत सोडणार, किरीट भाऊंचा गंडा बांधून घेणार पण आपली एकच अट आहे, नारायण राणेंचा बंगला तुम्ही कधी तोडणार, बीकेसीचा हिशोब कधी देणार, या सर्वांच्या मागे ईडी कधी  लावणार? असे सवाल उपस्थित करत त्यांनी किरीट सोमय्या यांना खोचक टोला लगावला. तसेच त्यांनी यावेळी मनसेच्या आजच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना देखील त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

नेमकं काय म्हणाल्या सुषमा अंधारे? 

सुषमा अंधारे या मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी यावेळी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या हे त्यांच्या टार्गेटवर होते. मी शिवबंधन एक मिनिटांत सोडणार, किरीट भाऊंचा गंडा बांधून घेणार पण आपली एकच अट आहे, नारायण राणेंचा बंगला तुम्ही कधी तोडणार, बीकेसीचा हिशोब कधी देणार, या सर्वांच्या मागे ईडी कधी  लावणार? असे सवाल उपस्थित करत त्यांनी किरीट सोमय्या यांना खोचक टोला लगावला आहे.

हेही वाचा : भाजप, मनसे आक्रमक झाल्याने राहुल गांधी नरमले? शेगावच्या सभेत सावरकरांवर बोलणं टाळलं

माझ्या सभांना इतकी गर्दी कशी जमते ?

पुढे बोलताना त्यांनी म्हटलं की, माझ्या सभांना इतकी गर्दी कशी जमते ? हे लोक येतात कुठून? मी संताचा विचार सांगतेय. मी भाजपचा द्वेषपूर्ण राजकारण संपवण्यासाठी महाप्रबोधन यात्रा काढत आहे. या देशाची नागरिक म्हणून काही प्रश्न पडले आहेत, त्याची उत्तरे शोधत आहे.

हेही वाचा :  सावरकरांचा मुद्दा राहुल गांधींसाठी हिट विकेट की गेम चेंजर? 

मनसेवर निशाणा

दरम्यान त्यांनी यावेळी मनसेवर देखील निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मनसे आक्रमक झाली आहे. मनसेकडून आज आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनावर  प्रतिक्रिया देताना सुषमा अंधारे यांनी मनसेला टोला लगावला आहे. मनसे नेहमी ड्रामा करते. त्याचं नेहमीचंच आहे. गेले अडीच वर्ष त्यांनी हेच केलं. ते ठरवून आंदोलन करतात अशी टीका अंधारे यांनी केली आहे. तसेच आमच्या शिरसाट भाऊंना काही देणार आहात की नाही ते सांगा, मी त्यांची बहीण आहे असं म्हणत त्यांनी आमदार संजय शिरसाट यांना देखील डिवचले आहे.

First published: