अविनाश कानडजे (औरंगाबाद) औरंगाबाद, 13 फेब्रुवारी : शिवसेनेतून बाहेर पडून शिंदे गटाने भाजपसोबत सरकार स्थापन केले. सहा महिने उलटल्यानंतर स्थानिक पातळीवर भाजप आणि शिंदे गटामध्ये कुरबुरी झाल्या आहेत. कृषी अब्दुल सत्तार यांच्याविरोधात भाजपने आता कडकडीत बंद पाळला आहे. शिंदे गटाचे कृषी मंत्री आमदार अब्दुल सत्तार यांच्या ताब्यात असलेल्या सिल्लोड नगरपरिषदेच्या करवाढी विरोधात भाजपकडून मागील आठवड्यात डफडे वाजवा आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर आज पुन्हा भाजपाने सिल्लोड नगरपरिषदेच्या करवाढी विरोधात कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन व्यापाऱ्यांना केले होते. (‘ती’ गोल्डन गँग कोण, संजय राऊतांचा रोख कुणाकडे? नेमका काय प्रकार?) या बंदला सकाळच्या सत्रात उत्सफुर्त प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येत आहे. यामुळे सिल्लोड शहरात भाजप विरुद्ध सत्तार हा संघर्ष आता आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येतीये. शिंदे गट आणि भाजपमध्ये ऑल इज नॉट वेल अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. काय आहे भाजपचा आक्षेप? राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची 30 वर्षांपासून एक हाती सत्ता असणाऱ्या सिल्लोड नगर परिषदेच्या विरोधात भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी करवाढीचा मुद्दा घेऊन आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सिल्लोड नगर परिषदेच्या वतीने मागील काही दिवसांपूर्वी शहरातील मालमत्ता करवाढीचा निर्णय घेण्यात आला होता. ही करवाढ नियमबाह्य पद्धतीने आकारल्याचा आरोप भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. (BMC निवडणुकीचं महाभारत! ‘फडणवीस रथ सारथी तर अर्जुन…’, काय म्हणाले बावनकुळे?) यामुळे भाजपच्या वतीने यापूर्वी उपोषणही केले होते. या करवाढीला तीव्र विरोध करण्यासाठी सिल्लोड शहरातील भाजपच्या कार्यालयापासून ते नगरपरिषदेच्या कार्यालयापर्यंत डफली वाजवा आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.