सुशील राऊत, प्रतिनिधी
औरंगाबाद, 23 फेब्रुवारी : बारावीच्या परीक्षा आता सुरू झाल्या आहेत. तर दहावीच्या परीक्षांचं काऊंटडाऊन सुरू झालंय. विद्यार्थी जीवनातील या दोन महत्त्वाच्या परीक्षा मानल्या जातात. त्यामुळे साहजिकच या दोन वर्गातील विद्यार्थी असलेल्या अनेक घरांमध्ये वर्षभर गंभीर वातावरण असतं. या विद्यार्थ्यांवर अभ्यासाचं, परीक्षेचं, भविष्यातील स्पर्धेचं दडपण असतं.
विद्यार्थ्यांवरील हा ताण कमी करण्यासाठी त्यांच्या पालकांची भूमिका महत्त्वाची असते. पण, प्रत्यक्षात पालकांकडूनही परीक्षेच्या काळात काही चुका होतात. त्याचा मुलांवर परिणाम होतो. दहावी बारावीच्या परीक्षेच्या कालावधीमध्ये काय काळजी घ्यावी आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात या संदर्भात औरंगाबादचे मानसोपचार तज्ञ डॉ.संदीप शिसोदे यांनी महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
SSC-HSC Exam : विद्यार्थ्यांनो, टेन्शन आलंय? 'या' पद्धतीनं सोडवा बिनधास्त पेपर! Video
पालकांनो, 'या' गोष्टी ठेवा लक्षात!
- मुल परीक्षेला जात असताना पालकांनी सूचना करणे टाळावं
- मुलांच्या चांगल्या गुणांचं कौतुक करावे.
- मुलांना परीक्षेच्या काळात चांगले मार्क्स हवेत असं वारंवार बजावू नये
- परीक्षा झाल्यावर मुलाची प्रश्नपत्रिका घेऊन त्यावरील चर्चा टाळावी. मुलांना किती मार्क्स मिळतील यावर लगेच अंदाज बांधू नये
- नातेवाईक, शिक्षक तसंच अन्य व्यक्तींकडून मुलाचं कौन्सिल करा असं सांगू नये. त्यामुळे मुलावर सतत परीक्षा या एकाच विषयाचा भडिमार होतो.
- मुलांसाठी सकारात्मक वातावरण निर्माण करावे आणि त्याचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी मदत करावी.
Latur Pattern: 'बायोलॉजी'मध्ये मिळतील 100 मार्क, पेपरपूर्वी करा असा अभ्यास, Video
प्रत्येक विद्यार्थी दहावी-बारावीची परीक्षा गांभीर्यानं घेतो. या परीक्षेचा वर्षभर अभ्यास करतो. या अभ्यासातून परीक्षा चांगली जाईल असा त्यांना आत्मविश्वास असतो. त्या परिस्थितीमध्ये पालकांनी जबाबदारीनं वागावं. मुलांना सकारात्मक राहण्यास मदत करावी. पालकांची या काळातील भूमिका विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर परीणाम करणारी असते. त्यामुळे पालकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे, असं आवाहन डॉ. संदीप शिसोदे यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Aurangabad, Career, HSC Exam, Local18, Ssc board