सुशील राऊत, औरंगाबाद औरंगाबाद, 20 फेब्रुवारी : बारावीची परीक्षा सुरू होण्यासाठी आता अवघे काही तास शिल्लक आहेत. तर 2 मार्चपासून दहावीची परीक्षा सुरू होत आहे. विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील या दोन्ही परीक्षा अत्यंत महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे साहजिकच या परीक्षांचं मोठं दडपण त्यांच्यावर असतं. विद्यार्थ्यांनी तणावमुक्त वातावरणात परीक्षा द्यावी यासाठी आता शिक्षण मंडळानंही पुढाकार घेतलाय. औरंगाबाद विभागातील प्रत्येक जिल्ह्यात दोन समुपदेशकांची नियुक्ती बोर्डाकडून करण्यात आली आहे. ताण होणार हलका महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाकडून बारावी आणि दहावीच्या परीक्षा घेण्यात येतात. या परीक्षेसाठी औरंगाबाद विभागातून यंदा 1 लाख 68 हजार 263 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. तर 1 लाख 80 हजार 210 विद्यार्थी दहावीची परीक्षा देतील. कोरोना काळानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या या परीक्षेसाठी औरंगाबाद बोर्डानं संपूर्ण तयारी केली आहे. या परीक्षेचं विद्यार्थ्यांना कोणतंही टेन्शन येऊ नये यासाठी बोर्डाकडून विशेष प्रयत्न केले जात आहेत औरंगाबाद विभागाच्या याच प्रयत्नांचा भाग म्हणून प्रत्येक जिल्ह्यात खास समुपदेशकाची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे नंबर्सही प्रसिद्ध करण्यात आले आहेत. परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांना टेन्शन आल्यास ते समुपदेशकांशी संपर्क साधू शकतात. परीक्षेचा ताण हलका होण्यास यामुळे त्यांना मदत मिळेल. Latur Pattern: फिजिक्समध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याचा फॉर्म्युला काय? पाहा Video
जिल्हानिहाय समुपदेशक
औरंगाबाद बाळासाहेब चोपडे : 9284847582 शशीमोहन शिरसाट : 9422715543 बीड एस.पी. मुटकुळे : 9689640500 सी. एस. सौंदाळे : 9422930599 जालना एसटी पवार : 94 0 5 91 38 00 सूर्यकांत भांडे भरड : 9404606479 परभणी पी.एम. सोनवणे : 9422178101 आमिर खान : 98 60 44 49 86 हिंगोली एस. पी. खिल्लारे : 9011594944 डी. आर. चव्हाण : 9822706102 Latur Pattern: 12 वीत गणिताचं नो टेन्शन; या ट्रिक्सनी मिळतील पैकीच्या पैकी गुण, Video
ज्या विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत काही अडचणी असतील किंवा परीक्षेचं दडपण येत असेल तर त्यांनी या क्रमांकावर संपर्क साधवा. त्या अडचणींचं निराकारण करावं आणि टेन्शन फ्री वातावरणात परीक्षा द्यावी असं आवाहन परीक्षा विभागाच्या वतीनं करण्यात आलं आहे.