ऋषिकेश होळीकर, प्रतिनिधी लातूर, 22 फेब्रुवारी: मागील काही वर्षापासून लातूर पॅटर्न हा शिक्षणाचा एक वेगळा पॅटर्न निर्माण झाला आहे. बारावी बोर्डाने जरी मेरिट लिस्ट बंद केली असली तरी लातूर शहरातील नामांकित व इतर सर्व महाविद्यालयांचा निकाल हा 80 ते 90 टक्के इतका लागतो. यामुळे सबंध महाराष्ट्रातील विद्यार्थी व पालकांचा ओढा याकडे लागला आहे. नुकतीच बोर्ड परीक्षेला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लातूर पॅटर्नमधील ट्रिक्स वापरून आपणही चांगले मार्क मिळवू शकता. Latur Pattern: 12 वीत गणिताचं नो टेन्शन; या ट्रिक्सनी मिळतील पैकीच्या पैकी गुण, Video जीवशास्त्र महत्त्वाचा विषय पुण्याला जरी शिक्षणाची पंढरी म्हणून संबोधले जात असले तरी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षणासाठी लातूरने आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. बारावी बोर्ड परीक्षेत जीवशास्त्र (बायोलॉजी) हा महत्त्वाचा विषय आहे. काही विद्यार्थ्यांना हा विषय अवघड वाटतो. परंतु, लातूर पॅटर्नमधील ट्रिक्सचा वापर केल्यास हा पेपर आपल्याला नक्कीच सोपा वाटेल व चांगले मार्कही मिळतील. Latur Pattern: फिजिक्समध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळवण्याचा फॉर्म्युला काय? पाहा Video या पद्धतीचा अवलंब करा आणि बायोलॉजीत मार्क मिळवा 1. महाविद्यालयात घेतल्या गेलेल्या सराव परीक्षांचे पेपर वेळोवेळी सोडवा. त्यामधील चुका स्वतः तपासा. 2. सेक्शन ए मधील सर्व प्रश्न काळजीपूर्वक सोडवा. ज्यामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळण्यास मदत होते. 3. सेक्शन बी मध्ये एका वाक्यात उत्तरे लिहा जास्त लिहीत बसण्याची आवश्यकता नाही. 4. बायोलॉजीमध्ये ज्या प्रश्नांमध्ये डिस्क्राइब द हार्ट असं विचारलं जातं त्यामध्ये विद्यार्थ्यांनी हृदयाची आकृती काढून त्याला नावे देणे अपेक्षित असते. 5. पाठ्यपुस्तकाचे वाचन नियमित करावे. त्याखालील प्रश्नसंच यावर विशेष लक्ष द्यावे. 6. मागील तीन ते चार वर्षात बारावी बोर्डाचा जो प्रश्नपत्रिकेचा संच आहे तो सोडवून घ्यावा. ज्यामुळे प्रश्नपत्रिकेचा आराखडा लक्षात येण्यास मदत होईल. 7. बायोलॉजी या विषयातील सर्व आकृती याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे. ज्यामुळे चार मार्काच्या प्रश्नासाठी मार्क मिळवण्यात मदत होईल. या सर्व पद्धतीचा वापर केल्यास जीवशास्त्र (बायोलॉजी) या विषयांमध्ये जास्तीत जास्त मार्क मिळतील, असे प्राध्यापक संजय बिराजदार यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.