औरंगाबाद, 29 जानेवारी : लोकशाहीची थट्टा करणारी घटना औरंगााबाद जिल्ह्यातील घडली आहे. शेलुद गावात ग्रामपंचायतीचा लिलाव झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सरपंचपद 14.50 लाखात तर उपसरपंच पद 4 लाखात विकल्याचा प्रकार समोर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, औरंगाबाद जिल्ह्यातील शेलुद गावात हा प्रकार घडला आहे. पैश्यांची बोली लावून, सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांची पदे विकल्याचा प्रकार घडला आहे. सदस्य पदासाठी 70 हजारांपासून 2 लाखापर्यंत बोली लागली होती. गावाच्या मंदिरासमोर ग्रामसभा बोलवून ग्रामपंचायत पदांचा लिलाव करण्यात आला होता.
(सर्व्हे बनवणारी कंपनी महाविकास आघाडीने तयार केली', रवी राणांचा नवीन शोध)
सरकार दरबारी मात्र ग्रामपंचायत बिनविरोध निवडल्याचा बनाव केला. ग्रामपंचायत लिलावाचा व्हिडीओ news18लोकमतच्या हाती लागला आहे. सरपंचपदी निवडून आलेल्या सरपंच पतीने मात्र लिलावाचा इन्कार केला आहे. मात्र गावातील नागरिकांकडून लिलावाचा जाहीर कबुली दिली आहे.
(नाशिकमध्ये भाजपचं ठरलं, विखे लागले कामाला, सत्यजीत तांबेंचा मार्ग मोकळा?)
शकुंतला योगेश ससेमहल असं 14.50 लाख रुपये देऊन सरपंचपदी निवडून आलेल्या महिलेचे नाव आहे. तर राजू म्हस्के असं 4 लाख रुपये भरून उपसरपंच झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मात्र लिलाव न पटल्यामुळे राजीनामा देऊन राजू म्हस्के या उपसरपंचाने हा प्रकार उघड केला आहे. या प्रकरणाचा व्हिडीओ समोर आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.