औरंगाबाद, 25 जानेवारी : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या पक्षात नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगली आहे. बीडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमाला दांडी मारल्यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याचे बोलले जात आहे. आज औरंगाबादमध्ये फडणवीस यांच्या दौऱ्यात स्वागतासाठी लावण्यात आलेल्या पोस्टर्समध्ये पंकजा मुंडे यांचा फोटो गायब आहे.
दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह झालेल्या बैठकीला पंकजा मुंडे हजर होत्या. पण, फडणवीस आज औरंगाबाद दौऱ्यावर पोहोचले असता स्वागताच्या बॅनर वर पंकजा मुंडे यांचा फोटो गायब असल्याचा प्रकार समोर आला आहे.
(कसबापेठ आणि पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीच्या तारखांमध्ये बदल, मतदान या दिवशी होणार)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबाद दौऱ्यावर आले असता त्यांच्या स्वागतासाठी भाजपचे नेते आणि मंत्री अतुल सावे यांच्याकडून बॅनर लावण्यात आले आहे. पण, यामध्ये पंकजा मुंडेंचा फोटो वगळण्यात आला आहे.
(एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचा शपथविधी असंविधानिक? राजभवनाने दिले धक्कादायक उत्तर)
आजी-माजी नेत्यांचे फोटो बॅनरला मात्र पंकजा मुंडे यांचे फोटो नसल्याचे चित्र औरंगाबादमध्ये पाहण्यास मिळाले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक असताना कार्यालय परिसरात हे बॅनर लावले आहे. राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांचा फोटो नसल्याने चर्चेला उधाण आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pankaja munde, औरंगाबाद, पंकजा मुंडे