पुणे, 25 जानेवारी : भाजपचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. पण आता निवडणूक कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आला आहे. 27 फेब्रुवारीला मतदान होणार असं जाहीर केलं होतं पण आता मतदान हे एक दिवस आधीच होणार आहे.
महाराष्ट्रातील दोन पोटनिवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर झाला आहे. पण राज्यात होऊ घातलेल्या बारावीच्या परीक्षांमुळे पिंपरी चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची मतदानाची तारीख बदलण्यात आलेली आहे. आता 26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. पण, मतमोजणीही 2 मार्च रोजीच होणार आहे.
(एकनाथ शिंदे आणि फडणवीसांचा शपथविधी असंविधानिक? राजभवनाने दिले धक्कादायक उत्तर)
कसबापेठमध्ये मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक होणार आहे. तर पिपरी चिंचवडमध्ये लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक होत आहे. अर्ज भरण्यासाठी 7 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिलेली आहे. त्यानंतर 10 फेब्रुवारीपर्यंत अर्ज मागे घेण्यासाठी मुदत दिली आहे.
असा आहे निवडणुकीचा कार्यक्रम
31 जानेवारी अधिसूचना
7 फेब्रुवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
8 फेब्रुवारी अर्जांची छाननी
10 फेब्रुवारी पर्यंत अर्ज परत घेता येणार
मतदान 26 फेब्रुवारी
निकाल 2 मार्च
दरम्यान, पुण्यातल्या कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवडच्या पोटनिवडणुकासाठी राजकीय वातावरण तापायला सुरूवात झाली आहे. कसबा विधानसभेची जागा महाविकास आघाडीने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला द्यावी, अशी मागणीच शिवसेनेचे माजी नगरसेवक विशाल धनवडे यांनी केली आहे. दोन दिवसात सचिन अहिर आणि संजय राऊत यांच्यासोबत बैठक होणार आहे. शिंदे गटाविरोधात असलेल्या वादाचा फायदा महाविकास आघाडीला होऊ शकतो याचा विचार करावा, असा मागणी सेनेनं केली आहे.
(पुण्यातील कसबा पोटनिवडणुकीची जागा सेनेला द्या, थेट अजितदादांकडेच मागणी)
तर, भाजपकडून शंकर जगताप अथवा दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांचं नाव कळवले आहे. तसंच कसबा विधानसभासाठी भाजपची काही नावं पुढे येत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.