मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

म्हाडा परीक्षा पेपरफुटीच्या रॅकेटचं मूळ औरंगाबादेत, तीन क्लासेस चालकांचा पर्दाफाश

म्हाडा परीक्षा पेपरफुटीच्या रॅकेटचं मूळ औरंगाबादेत, तीन क्लासेस चालकांचा पर्दाफाश

आरोग्य विभागा (Health Department)  पाठोपाठ आता म्हाडाच्या (MHADA Exams)  परिक्षेचे पेपरफुटीचे रॅकेट समोर आलं आहे.

आरोग्य विभागा (Health Department) पाठोपाठ आता म्हाडाच्या (MHADA Exams) परिक्षेचे पेपरफुटीचे रॅकेट समोर आलं आहे.

आरोग्य विभागा (Health Department) पाठोपाठ आता म्हाडाच्या (MHADA Exams) परिक्षेचे पेपरफुटीचे रॅकेट समोर आलं आहे.

  • Published by:  Pooja Vichare

औरंगाबाद,13 डिसेंबर: आरोग्य विभागा (Health Department) पाठोपाठ आता म्हाडाच्या (MHADA Exams) परिक्षेचे पेपरफुटीचे रॅकेट समोर आलं आहे. दहा दिवसांमध्ये समोर आले . यात प्रामुख्याने औरंगाबादमध्ये सरकारी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये परिचित असलेले गणिताचे प्राध्यापक अजय नंदू चव्हाण आणि सक्षम अ‍ॅकॅडमीचा संचालक कृष्णा शिवाजी जाधव, अंकित संतोष चनखोरे हे त्यांच्या अकॅडमी मधील विद्यार्थ्यांसाठी रॅकेटच्या प्रमुख सुत्रधाराकडून पेपर विकत घेणार होते. त्यामुळे औरंगाबादच्या (Aurangabad) शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

शहरात मागील काही वर्षांमध्ये स्पर्धा परीक्षेचे क्लासेसची वाढती संख्या आणि क्रमानं स्पर्धेत यशस्वी विद्यार्थ्यांचा आकडा वाढवण्यासाठी आता क्लासेस चालक आधीच पेपर विकत घेण्याच्या घोटाळ्यात सहभागी होत असल्याचं समोर आलं आहे.

हेही वाचा- प्रकाश आंबेडकरांचा ओवैसींना धक्का, BMC निवडणुकीसाठी 'या' पक्षासोबत आघाडी

या परिक्षेच्या आयोजनाचे कंत्राट जी.ए.सॉफ्टवेअर कंपनीला देण्यात आली होती. या कंपनीचा संचालक डॉ.प्रितीश देशमुख यांनीच पेपर फोडल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्यांनी रॅकेट उघडकीस आणलं. देशमुखला अटक केल्यानंतर मात्र आरोग्य विभागाच्या घोटाळ्याप्रमाणेच शहरातील दोन क्लासेसचे तीन प्राध्यापकांनीच सर्वाधिक पेपरची मागणी केल्याचे समोर आले.

चव्हाणचे गणिताचे पुस्तक प्रकाशित, दहा वर्षांपासून सक्रिय

परीक्षेचे कंत्राट असलेल्या आरोपी डॉ. प्रितिश देशमुख याने संतोष हरकळ आणि अंकुशयांच्या बरोबर एकत्र येत लेखी निवड परीक्षेचे काम सोपवले होते. तिघेही सोबतच गाडीत पळून जात असताना पोलिसांनी पकडले असता त्यांच्याकडे पेपर आणि पेनड्राईव्ह आढळून आले.

पुणे पोलिसांनी पेपर फुटी प्रकरणात शहरातील टार्गेट अकॅडमीचा अजय नंदु चव्हाण , सक्षम अ‍ॅकॅडमीचा संचालक कृष्णा शिवाजी जाधव, अंकित संतोष चनखोरे यांना देखील म्हाडा च्या पेपर फुटीप्रकरणात मुख्य आरोपी केले आहे. यापुर्वी ते आरोग्य विभागाच्या घोटाळ्यात देखील आरोपी आहेत.

चिकलठाण्यातील मिलेनियक पार्क मध्ये राहणारे,नोकरी करणाऱ्या संतोष लक्ष्मण हरकळ आणि त्याचा भाऊ अंकुश रामभाऊ हरकळ यांच्या मदतीने हे पेपर विकत घेण्याच्या घोटाळ्यात सहभागी झाल्याचा पोलिसांना प्राथमिक संशय आहे. यात रविवारी पोलिसांनी हरकळला अटक केली.

कोण आहे चव्हाण

गेल्या दहा वर्षांपासून चव्हाण शहरात स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अध्यापनाचे काम करतो. मूळ लोणारचा असलेला चव्हाणनं डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून गणित, फिजिक्स विषयात शिक्षण घेतले. सुरूवातीला खासगी क्लासेसवर प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या चव्हाणनं कालांतरानं टीव्ही सेंटर परिसरात ‘द टार्गेट करिअर पाँईट’ हा क्लास सुरू केला. 1 डिसेंबरपासून आगामी 13 हजार पोलीस भरतीच्या पदांसाठी त्याने स्पेशल बॅच देखील नियोजित केली होती.

हेही वाचा- 5 वेळा पलटली फॉर्च्युनर, Shocking Live Video आला समोर

गणित आणि बुद्धिमत्तामध्ये चव्हाण तज्ज्ञ असून 2019 मध्ये त्याने स्पर्धा परीक्षेच्या बदलल्या पॅटर्नवर आधारित मास्टर ऑफ मॅथ्स हे पुस्तक देखील प्रकाशित केले. त्याने त्यानंतर पैठण गेट परिसरातील सक्षम एमपीएससी-यूपीएससी परीक्षा मार्गदर्शन केंद्राचा अंकित चनखोरे आणि कृष्णा जाधव सोबत भागीदारीत क्लासेस सुरू केले. यात शहरातील क्लासेस चालकांच्या माहितीनुसार, कृष्णा नोकरी करत असल्यानं चनखोरेला त्याने त्याच्या सक्षमचा संचालक बनवले.

म्हाडाच्या पेपर फुटीप्रकरणात त्यांनी जवळपास 45 विद्यार्थ्यांकडून त्यांची प्रवेशपत्रे, मूळ शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, कोरे धनादेश घेऊन ठेवले होते. गेल्या चार वर्षांमध्ये चव्हाण क्लासेसच्या यशामुळे अचानक टीव्ही सेंटर भागात चर्चेत आला.

शहरातील वाढते क्लासेस आणि स्पर्धेमुळे भ्रष्टाचाराचा मार्ग

शहरातील पाच जण राज्यस्तरीय घोटाळ्यात सहभागी असल्याचे समोर आले आणि शहरात खळबळ उडाली. यात जालना, सिल्लोड तालुक्यात देखील पाळेमुळे पसरले. तज्ज्ञांच्या मते, शहरात टीव्ही सेंटर, पैठण गेट भागात कोटा शहराप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली आहे.

हेही वाचा- गुन्हा दाखल झाल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

प्रत्येक इमारतीमध्ये अभ्यासिका आणि स्पर्धा परीक्षेचे क्लासेस, मार्गदर्शन केंद्र उघडलेले पाहायला मिळते. परिणामी, त्यांच्यात स्पर्धा वाढली आणि निकाल दाखवण्याच्या ईर्षेने प्राध्यापक थेट घोटाळ्यात सहभागी होऊन यशस्वी विद्यार्थ्यांचा आकडा वाढलेला दाखतात. यात जवळच्या, विश्वासू विद्यार्थ्यांनाच हे प्राध्यापक यासाठी विचारणा करतात.

First published:

Tags: Aurangabad News