मुंबई, 13 डिसेंबर: मुंबई महापालिकेच्या (BMC Election 2022) निवडणुकीसाठी वंचित (VBA)बहुजन आघाडीची राष्ट्रीय जनता दल (Rashtriya Janata Dal) आणि मुस्लिम लीग (Muslim League) सोबत आघाडी (alliance) करणार असल्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे. जानेवारीच्या मध्यापर्यंत तिन्ही पक्ष मिळून जागावाटप जाहीर करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. यासोबत आमच्यासोबत आणखी काही पक्ष देखील येताहेत. त्यानुसार आम्ही आमच्या जागा वाटप करणार असल्याचं प्रकाश आंबडेकर यांनी म्हटलं आहे. तसंच उद्या आम्ही प्रचाराला सुरुवात करत असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. काँग्रेस सोबत युतीचे पर्याय खुले काँग्रेसच्या मनात वंचित बहुजन आघाडीची भीती असून आम्ही काँग्रेससोबत युतीचे पर्याय खुले ठेवल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. हेही वाचा- म्हाडाच्या परीक्षेसंदर्भात जितेंद्र आव्हाड यांची महत्त्वाची माहिती आम्ही शिवसेना सोबत पर्याय म्हणून पुढे येऊ मात्र ते वंचितला सोबत घेतील का हे बघण महत्वाचं असल्याचंही प्रकाश आंबेडकर म्हणालेत. ओवैसींना धक्का MIM आमच्यासोबत नसून ते आमच्यासोबत नाराज आहेत,असं ते म्हणालेत. राजकारण हे रिलीजीयस पध्दतीनं व्हावं हा आमचा हेतू नाही. मागच्या युनियन वेळी एम आय एम आणि आम्ही एकत्र होतो.काँग्रेसचा पर्याय तेव्हाही होता आजही खुला आहे, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. मात्र पालिकेच्या निवडणुकीत आम्ही एकत्र नाहीत अजून MIM सोबत स्पष्टता नाही,असंही ते म्हणालेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.