Home /News /mumbai /

रिक्षा चालकाला वाचवण्याच्या नादात 5 वेळा पलटली फॉर्च्युनर, Shocking Live Video आला समोर

रिक्षा चालकाला वाचवण्याच्या नादात 5 वेळा पलटली फॉर्च्युनर, Shocking Live Video आला समोर

नवी मुंबईतील पामबीच मार्गावरील सीवूड सिग्नल जवळ अपघात झाला. रिक्षा (auto rickshaw) चालकाला वाचवण्याच्या नादात भरधाव वेगात असलेली फॉर्च्युनर कार ( Fortuner car ) डिव्हायडरवर आदळून पलटी झाली.

नवी मुंबई, 13 डिसेंबर: नवी मुंबईतील पामबीच मार्गावरील सीवूड सिग्नल जवळ अपघात झाला. रिक्षा (auto rickshaw) चालकाला वाचवण्याच्या नादात भरधाव वेगात असलेली फॉर्च्युनर कार ( Fortuner car ) डिव्हायडरवर आदळून पलटी झाली. या भीषण अपघातात 7 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहून अपघाताची भीषणता दिसून येत आहे. बेलापूरकडून सीवूड्सच्या दिशेनं जाणारी रिक्षा सिग्नल तोडून जात असताना त्याच वेळी अतिशय वेगानं विरुद्ध दिशेनं म्हणजे वाशी कडून बेलापूरच्या दिशेने जाणाऱ्या फॉर्च्युनर कार चालली होती. या कारनं रिक्षावाल्यास वाचवण्याचा प्रयत्न करत असताना फॉर्च्यूनर कार डाव्या बाजूला डिव्हाईडरला धडक देऊन विरुद्ध दिशेला 3 ते 4 पलटी मारली. त्यानंतर कार 100 मीटर अंतरावर जाऊन आदळली. या अपघातात फॉर्च्युनरमध्ये पाच लोक आणि रिक्षामध्ये दोन लोक असे 7 जण गंभीर जखमी झालेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कारचा वेग जास्त असल्यामुळे डिव्हायडरला धडक दिल्यानंतर विरुद्ध दिशेला 3 ते 4 पलटी मारली आणि शंभर मीटर अंतरावर जाऊन आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, याच फॉर्च्युनरचा अक्षरश: चुराडा झाला. पण रिक्षाला मोठी हानी झाली नाही. रिक्षाची समोर काच फुटली आणि किरकोळ नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही वाहनं बाजूला केली. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. अपघातग्रस्त वाहनं बाजूला हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Cctv footage, Road accident

पुढील बातम्या