अविनाश कानडजे, औरंगाबाद 08 ऑक्टोबर : 5 ऑक्टोबर रोजी मुंबईतील बीकेसी मैदानावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्यासाठी अनेक जिल्ह्यांमधील कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यावरून परत येताना यवतमाळ जिल्ह्यातील एकाने वैजापूर येथील नारंगी धरणात उडी मारल्याची घटना गुरुवारी 4:30 वाजता घडली होती. हा व्यक्ती आता अखेर 26 तासानंतर सुखरूप सापडला आहे.
मोठी दुर्घटना! नाशिकमध्ये खासगी बसने घेतला पेट; 10 जणांचा आगीत होरपळून मृत्यू, VIDEO
दिनेश महादेवराव सोनवणे असं या व्यक्तीचं नाव आहे. सोनोने संजय राठोड यांच्या मतदारसंघातील आहेत. मुख्यमंत्र्यांचा दसरा मेळावा संपल्यानंतर शिर्डीमध्ये साईबाबाचे दर्शन घेऊन सोनवणे आणि त्यांचे 25 सहकारी वैजापूर मार्गे यवतमाळला जाण्यासाठी निघाले होते. मात्र सोनवणे विचित्र वागत असल्यामुळे त्यांच्यासोबत असलेल्या सहकाऱ्यांनी त्यांना नौगजी बाबा दर्गा येथे नेलं.
सोनवणे यांनी इथून पळ काढून धरणात उडी घेतली. तेव्हापासून वैजापूर पोलीस आणि अग्निशामक पथक त्यांचा शोध घेत होते. मात्र दोन्ही दलाच्या पथकांना यश आलं नाही. मात्र, आता तब्बल 26 तासानंतर सोनवणे हे धरणाच्या बंधार्यातून दोन किलोमीटर पोहत-पोहत एका शेतात चिखलामध्ये बसलेले आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिलं आहे.
दुसऱ्या एका घटनेत मुंबई येथील शिंदे यांच्या दसरा मेळाव्याहून गावाकडे परतणाऱ्या महिलेला भरधाव कारनं धडक दिली. या धडकेत महिला जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी सकाळच्या सुमारास औरंगाबादमध्ये घडली. घटना घडताच कारचालकाने घटनास्थळावरून धूम ठोकली. कमळाबाई देवाजी पाठक (वय 75 वर्षे) असं अपघातातील मृत महिलेचं नाव आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.