जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'सत्तार मला कधीही आऊट करणार नाही, नेहमी जिंकण्यासाठीच..'; इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याने पिकला हशा

'सत्तार मला कधीही आऊट करणार नाही, नेहमी जिंकण्यासाठीच..'; इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याने पिकला हशा

'सत्तार मला कधीही आऊट करणार नाही, नेहमी जिंकण्यासाठीच..'; इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याने पिकला हशा

जलील यांना विचारले असता, ते म्हणाले की मी स्वतःहून आऊट झालो आहे. सत्तार मला कधीही आऊट करणार नाही. ते नेहमी मला जिंकण्यासाठी मदत करतील.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

औरंगाबाद 31 ऑक्टोबर : औरंगाबाद शहरात खासदार इम्तियाज जलील यांच्या दुवा फाउंडेशनच्या वतीने आयजे फेस्टचे आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन रविवारी सायंकाळी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार, खासदार इम्तियाज जलील आणि जिल्हाधिकारी अस्तित कुमार पांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलं. यावेळी अब्दुल सत्तार यांच्या गोलंदाजीवर इम्तियाज जलील हे ‘क्लीन बोल्ड’ झाले. राणा-कडू वाद अखेर मिटला? वर्षावरील चर्चेनंतर दोन्ही नेत्यांनी दिली महत्त्वाची प्रतिक्रिया यानंतर या संदर्भात जलील यांना विचारले असता, ते म्हणाले की मी स्वतःहून आऊट झालो आहे. सत्तार मला कधीही आऊट करणार नाही. ते नेहमी मला जिंकण्यासाठी मदत करतील. त्यांच्या या वक्तव्याने कार्यक्रमस्थळी एकच हशा पिकला. जलील यांचं सत्तारांबाबतचं जुनं विधान - याआधीही काही महिन्यांपूर्वी बोलताना इम्तियाज जलील यांनी अब्दुल सत्तारांनी आपल्याला मदत केल्याचं म्हटलं होतं. लोकसभेच्या निवडणुकीत अब्दुल सत्तार यांची मदत मला मिळाली आणि माझ्या विजयी होण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे औरंगाबादचे किंगमेकर असल्याचं देखील जलील यांनी म्हटलं होतं.. भाजप म्हणजे कॉफीवरील फेस तर RSS.. प्रशांत किशोर यांचा थेट संघावर हल्ला, म्हणाले गोडसे.. आम्ही भलेही दोन वेगवेगळ्या पक्षात असोत पण आमची मैत्री खूपच चांगली आहे, असं इम्तियाज जलील म्हणाले होते. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. अशात आता पुन्हा एकदा त्यांनी अब्दुल सत्तार हे मला कधीच आऊट करणार नाहीत, असा दावा केला आहे. त्यामुळे, त्यांचं हे विधानही सध्या चर्चेत आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात