मराठी बातम्या /बातम्या /देश /

भाजप म्हणजे कॉफीवरील फेस तर RSS.. प्रशांत किशोर यांचा थेट संघावर हल्ला, म्हणाले गोडसे..

भाजप म्हणजे कॉफीवरील फेस तर RSS.. प्रशांत किशोर यांचा थेट संघावर हल्ला, म्हणाले गोडसे..

प्रशांत किशोर यांचा थेट संघावर हल्ला, म्हणाले गोडसे..

प्रशांत किशोर यांचा थेट संघावर हल्ला, म्हणाले गोडसे..

राजकीय रणनीतीकारातून राजकारणी झालेले प्रशांत किशोर यांनी रविवारी भाजप-आरएसएस युतीची तुलना कॉफीच्या कपाशी केली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

पाटणा, 30 ऑक्टोबर : राजकीय रणनीतीकारपासून राजकाणी झालेले प्रशांत किशोर यांनी रविवारी भाजप-आरएसएसच्या नात्याची तुलना कॉफीच्या कपाशी केली, ज्यामध्ये भाजप पक्ष कॉफीवर येणाऱ्या फेसासारखा आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्याचा गाभा असल्याचे त्यांनी म्हटले. आपल्या जन सुरज मोहिमेचा एक भाग म्हणून, 2 ऑक्टोबरपासून बिहारमध्ये 3,500 किमी लांबीची पदयात्रा काढणारे किशोर यांनी आज पश्चिम चंपारण जिल्ह्यातील लॉरिया येथे एका मेळाव्याला संबोधित केले.

यावेळी गांधींच्या काँग्रेसचे पुनरुज्जीवन करुन नथुराम गोडसेंच्या विचारसरणीचा पराभव केला जाऊ शकतो, हे लक्षात यायला बराच वेळ लागला. नितीश कुमार आणि जगन मोहन रेड्डी यांच्यासारख्या लोकांना मदत करण्याऐवजी मी ते केले असते तर बरे झाले असते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

प्रशांत किशोर यांनी भाजप-आरएसएसची तुलना केली कॉफी कपाशी

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रथ रोखण्यासाठी एकजुटीने विरोधी पक्ष किती परिणामकारक ठरेल यावर साशंक असलेले iPAC चे संस्थापक किशोर यांनी ठणकावून सांगितले की, जोपर्यंत देशात भाजप का आहे? हे समजत नाही तोपर्यंत त्याचा पराभव करता येणार नाही. ते म्हणाले, 'कधी कॉफीचा कप पाहिला असेल, तर त्यावर सर्वात वर फेस असतो. भाजप हा तुम्हाला दिसत असलेल्या फेससारखा आहे. त्या खाली RSS ची खूप खोल रचना आहे.

RSS ने समाजात त्यांची विचारधारा रुजवली: किशोर

किशोर म्हणाले की, अनेक वर्षांच्या अथक परिश्रमानंतर आरएसएसने आपली विचारधारा समाजात रुजवली आहे, आता तुम्ही कितीही हातपाय हालवले तरी ते बाहेर पडणार नाही. त्यासाठी मेहनत घ्यावी लागणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी 10-15 वर्षे लागली तरी त्याविरोधात जोरदार लढा द्यावा लागेल, असा संकल्प आपल्याला घ्यायचा आहे.

वाचा - गुजरात निवडणुकीपूर्वी BJP मोठा गेम करणार; समान नागरी कायद्याची घोषणा होणार?

मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरही हल्लाबोल

2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींसाठी निवडणूक मोहीम राबवल्यानंतर राजकीय रणनीतीकार किशोर प्रथम प्रसिद्ध झाले, ज्यांनी भाजपला स्वबळावर बहुमत मिळवण्यास मदत केली. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावरही किशोर सतत निशाणा साधत आहेत. नितीश कुमार यांचा पक्ष जेडी(यू) वर ‘भाजपचे एजंट’ असल्याचा आरोप त्यांनी केला. नितीश कुमार यांनी वारंवार फोन करूनही ते जेडीयूसोबत गेले नसल्याचे किशोर म्हणाले.

कारण स्पष्ट करताना ते म्हणाले, "जेडीयूचा राष्ट्रीय उपाध्यक्ष असताना, जेव्हा मला कळले की माझ्या पक्षाने सीएए-एनआरसीच्या बाजूने मतदान केले आहे, तेव्हा मी नितीश कुमार यांना असे केल्याबद्दल विचारले. तेव्हा नितीश कुमार म्हणाले की, मी दौऱ्यावर होतो, मला माहीत नाही, पण आम्ही बिहारमध्ये त्याची अंमलबजावणी होऊ देणार नाही. तेव्हा मला समजले की अशा माणसासोबत काम करणे शक्य नाही आणि भाजपला रोखण्यासाठी पश्चिम बंगालच्या लढाईत उडी घेतली.

ते म्हणाले की, तृणमूल काँग्रेसची अवस्था वाईट होती, पण भाजपला रोखण्यात त्यांनी यश मिळवले. भाजपला शंभरचा टप्पा ओलांडू देणार नाही, असे जाहीरपणे सांगितले होते आणि निवडणुकीतही तेच झाले, असे किशोर म्हणाले. किशोर यांचा बहुप्रतीक्षित काँग्रेस प्रवेश गेल्या वर्षी मोठ्या नेत्यांसोबतच्या भेटीनंतरही झाला नाही. ते अजूनही संघटनेचे कौतुक करतात. मात्र, ते महात्मा गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसचे कौतुक करतात. "महात्मा गांधींच्या काँग्रेसचे पुनरुज्जीवन करूनच गोडसेच्या विचारसरणीचा पराभव केला जाऊ शकतो," असे किशोर म्हणाले.

First published:

Tags: BJP, Prashant kishor, RSS