औरंगाबाद 26 सप्टेंबर : औरंगाबादमधील फेमस युट्युबर गर्ल बिंदास काव्या काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. बिंदास काव्या अचानक बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली होती. तिच्या पालकांनी याबाबत पोलिसांत तक्रारही केली होती. यानंतर काव्या मध्य प्रदेशच्या इटारसी स्टेशनवर सापडली होती. याप्रकरणात आता मोठा खुलासा झाला आहे. मित्रासोबत दुचाकीवर गेला आणि…, बुलढाण्यात आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा हरपला टिक टॉक स्टार काव्या बिनधास्त गायब झाल्याची घटना समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरली होती. काव्याचे विविध समाजमाध्यमांवर पाच मिलियनपेक्षा जास्त फॅन फॉलोअर्स आहेत. 9 सप्टेंबर रोजी ती अचानक गायब झाली होती. यानंतर तिच्या आई-वडिलांनी मुलगी गायब झाल्याची तक्रार पोलिसांत दिली. ती आपला फोन घरीच विसरल्याचं त्यांनी सांगितलं. यानंतर तिच्या आई-वडिलांनी तिचा लॉक असलेला फोन उघडून फोनमध्ये व्हिडिओ बनवून समाजमाध्यमांवर भावनिक सादही घातली. यावेळी दोघंही रडले. या सगळ्यानंतर काव्य मध्य प्रदेशातील स्टेशनवर सापडली. यानंतर असं सांगितलं गेलं की घरच्यांवर नाराज होऊन ती घरातून निघून गेली होती. मात्र, सत्य काही वेगळंच होतं. मृतदेहासोबत 17 महिने राहणाऱ्या कुटुंबीयांनी उपचारासाठी 30 लाख केले खर्च; शवाला ऑक्सिजन, ग्लुकोज अन् रेमिडिसीवीरही दिलं इटारसी स्थानकावर काव्या पोहोचताच तिथे पोलीस आणि तिचे आई-वडील हजर झाले. यानंतर इटारसीच्या पोलिसांनी तिथल्या बाल न्याय मंडळासमोर तिला हजर करणं कायद्यानुसार बंधनकारक होतं. मात्र, या सर्व बाबींना फाटा देत पोलीस तिला सरळ औरंगाबादला घेऊन आले आणि आई-वडिलांच्या ताब्यात दिलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.