मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

मृतदेहासोबत 17 महिने राहणाऱ्या कुटुंबीयांनी उपचारासाठी 30 लाख केले खर्च; शवाला ऑक्सिजन, ग्लुकोज अन् रेमिडिसीवीरही दिलं

मृतदेहासोबत 17 महिने राहणाऱ्या कुटुंबीयांनी उपचारासाठी 30 लाख केले खर्च; शवाला ऑक्सिजन, ग्लुकोज अन् रेमिडिसीवीरही दिलं

एका को ऑपरेटिव्ह बँकेत काम करणारी मिताली दररोज बँक जाण्यापूर्वी मृतदेहाच्या पायाला स्पर्श करून जात होती. त्याच्या शेजारी बसून न्याहाळत होती.

एका को ऑपरेटिव्ह बँकेत काम करणारी मिताली दररोज बँक जाण्यापूर्वी मृतदेहाच्या पायाला स्पर्श करून जात होती. त्याच्या शेजारी बसून न्याहाळत होती.

एका को ऑपरेटिव्ह बँकेत काम करणारी मिताली दररोज बँक जाण्यापूर्वी मृतदेहाच्या पायाला स्पर्श करून जात होती. त्याच्या शेजारी बसून न्याहाळत होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Meenal Gangurde

कानपुर, 25 सप्टेंबर : उत्तर प्रदेशातील कानपुरच्या रावतपुर येथील इन्कम टॅक्स विभागातील अधिकारी विमलेश दीक्षित यांच्या मृतदेहावर 17 महिन्यांपर्यंत कुटुंबीयांकडून उपचार सुरू होता. 23 सप्टेंबर 2022 रोजी या घटनेचा खुलासा झाला. या 17 महिन्यात विमलेश दीक्षित यांच्या मृतदेहावर तब्बल 30 लाख रुपयांचा खर्च करण्यात आल्याचंही कुटुंबीयांनी सांगितलं. हा सर्व खर्च मुलाच्या उपचारासाठी केल्याचंही कुटुंबीयांची सांगितलं.

पीजीआयमध्ये एन्ट्री मिळाली नाही...

2021 मध्ये विमलेश यांना मृत घोषित केल्यानंतर कुटुंबीय त्याला घरी घेऊन आले. विमलेशच्या हृदयाचे ठोके सुरू असल्याचं सांगून त्यांनी त्याच्यावर अंत्यसंस्कार केले नाही. घरात त्याच्यावर उपचार सुरू केला. आणि 4 दिवसात कुटुंबीयांनी ऑक्सिजनच्या सिलेंडरसाठी 9 लाखांचा खर्च केला होता. कोरोना काळात आधीत ऑक्सिजन सिलेंडरची कमतरता होती. त्यामुळे एक सिलिंडर तब्बल 1 लाख रुपयात खरेदी केला.

जीवापाड प्रेमात झाली मनोरूग्ण, 17 महिन्यांपर्यंत मृतदेहाची सेवा; दररोज नमस्कार करून ड्यूटीवर जात होती बँक मॅनेजर पत्नी

विमलेशच्या वडिलांनी सांगितलं की, 22 एप्रिल 2021 नंतर त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं. त्याच्या दीड महिन्यानंतर ते पुन्हा रुग्णालयात पोहोचले. मात्र कोरोनामुळे त्यांना रुग्णालयात येऊ दिलं नाही. यानंतर एका खासगी रुग्णालयात विमलेश याला भरती करण्यात आलं. रुग्णालयानेही त्यांच्याकडून मोठी रक्कम वसुल केली.

पहिले सहा महिने बनावटी डॉक्टरांनी त्याच्यावर घरीच उपचार केला. विमलेशला ग्लुकोज दिलं जात होतं. इतकच नाही तर रेमडेसीवीर इंजेक्शनही खरेदी करून देण्यात आवं. 6 महिन्यांनंतर विमलेशचं नस सापडत नसल्याने त्या डॉक्टरने उपचारास नकार दिला. सध्या या प्रकरणात तपासासाठी टीमचं गठण करण्यात आलं आहे. तब्बल 17 महिन्यांपर्यंत त्याचा मृतदेह घरात कसा ठेवण्यात आला, याचाही तपास केला जाणार आहे. मृतदेह कुजला नाही, असं कसं घडू शकतं? कोणी त्यांच्याकडून किती वसुल केले याचाही शोध घेतला जाणार आहे.

17 महिन्यांपासून विमलेशच्या मृतदेहाची काळजी घेतली जात होती. त्याच्या घरातील सर्वांना विश्वास वाटत होता की, विमलेश जिवंत होईल. आता तो फक्त कोमामध्ये गेला आहे. एकेदिवशी तो जिवंत होईल, असा सर्वांचा विश्वास होता. एका को ऑपरेटिव्ह बँकेत काम करणारी मिताली दररोज बँक जाण्यापूर्वी मृतदेहाच्या पायाला स्पर्श करून जात होती. त्याच्या शेजारी बसून न्याहाळत होती. त्याच्या डोक्यावरून हात फिरवायची. विमलेशचे आई-वडीलदेखील त्याच्या मृतदेहाची काळजी घेत. डॉक्टरदेखील ही दूर्मीळ केस असल्याचं मानत होते. मात्र 17 महिन्यांपर्यंत काहीही न खाता कोणी जीवंत कसं काय राहू शकतं.

First published:

Tags: Crime news, Uttar pardesh