मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मित्रासोबत दुचाकीवर गेला आणि..., बुलढाण्यात आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा हरपला

मित्रासोबत दुचाकीवर गेला आणि..., बुलढाण्यात आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा हरपला

बुलढाणा शहरातील चिखली रोडवर भरधाव कंटेनरने दुचाकीस्वारांना धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Buldana, India
  • Published by:  Chetan Patil

राहुल खंदारे, बुलढाणा, 25 सप्टेंबर : बुलढाणा शहरातील चिखली रोडवर भरधाव कंटेनरने दुचाकीस्वारांना धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. तर एक तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली.

सुमेध कहाळे (वय 22 वर्ष)असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर जखमी झालेल्या तरुणाचे श्रावण हेलोडे (वय वर्ष 20) असून दोघेही बुलडाणा शहरातील भीमनगर भागातील राहणारे आहे. सुमेध हा आई-वडिलांचा एकुलता एक होता.

(मुंबईत घरं कोसळली, मोठी दुर्घटना, घटना कॅमेऱ्यात कैद, पाहा VIDEO)

सुमेध दुचाकीने आपल्या मित्र श्रावण याच्यासोबत चिखलीकडून बुलडाण्याकडे जात होता. दरम्यान चिखली रोडवर पाठीमागून येणाऱ्या कंटेनरने सुमेधच्या दुचाकीला धडक दिली. धडक दिल्याने सुमेध हा कंटेनरच्या चाकाखाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर श्रावण हा बाजूला पडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.

हाकेच्या अंतरावर असलेल्या शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान अपघातास कारणीभूत ठरलेल्या कंटेनरचा चालक घटनास्थळावर कंटेनर उभा करून पसार झाला. कंटेनर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून पुढील कारवाई सुरू आहे.

First published: