जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Diwali 2022 : दिवाळीनिमित्त औरंगाबादमध्ये दागिन्यांवर 50 टक्के सूट, पाहा Video

Diwali 2022 : दिवाळीनिमित्त औरंगाबादमध्ये दागिन्यांवर 50 टक्के सूट, पाहा Video

Diwali 2022 : दिवाळीनिमित्त औरंगाबादमध्ये दागिन्यांवर 50 टक्के सूट, पाहा Video

औरंगाबाद शहरातील सोनसखी जेम्स अँड ज्वेलरी सेंटर तर्फे दागिन्यांच्या किंमतीवर विशेष 50 टक्क्यांची सूट देण्यात आली आहे.

  • -MIN READ Aurangabad,Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

    औरंगाबाद 21 ऑक्टोबर : प्रकाश, मांगल्य आणि उत्साहाचा सण म्हणजे दिवाळी. याच दिवाळी सणानिमित्त बाजारपेठेमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत आहे. त्यात दिवाळी म्हटलं तर खरेदी आलीच दिवाळीनिमित्त इलेक्ट्रॉनिक वस्तू, कपडे यासह सोने चांदी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. मात्र, यंदा महागाईने तोंड वर काढल्यामुळे प्रत्येक वस्तूच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. यामध्ये सोने चांदीच्या किंमती गगनाला भिडल्याचे पाहिला मिळत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकाला सोने चांदी खरेदी करणे शक्य होत नाही. ही गोष्ट लक्षात घेऊन औरंगाबाद शहरातील सोनसखी जेम्स अँड ज्वेलरी सेंटर तर्फे दागिन्यांच्या किमतींवर विशेष 50 टक्क्यांची सूट देण्यात आली आहे. यामुळे सोने चांदी जरी घेणे शक्य झालं नाही तरी या दागिन्यांवरती महिलांना आपली  हौस पूर्ण करता येणार आहे. ज्यामध्ये महिलांना विशेष आकर्षण असलेल्या दागिन्यांवरती सूट देण्यात आली आहे. ही विशेष ऑफर 27 ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे, अशी माहिती सोन सखीचे जेम्स अँड ज्वेलरी सेंटरचे मॅनेजर किशोर अवताडे यांनी दिली आहे. हेही वाचा :  Diwali 2022 : दिवाळीत फराळाला बनवा पोडाची शंकरपाळी, पाहा Recipe Video दागिन्यांवर अशी आहे सूट मंगळसूत्र -4000 आता 1499 राणीहार - 4999 आता 1999 कोंबो सेट- 5999 आता 2499 कोंबो सेट - 7999आता 3499 कोंबो सेट -12999 आता - 5499 तसेच कोणत्याही 2500 रुपयांच्या खरेदीवर सेमी पैठणी साडी फ्री मिळणार आहे. तर 1 हजार रुपयांच्या खरेदीवर लक्ष्मी पूजनासाठी सुवर्ण चौरंग मोफत मिळणार आहे. हेही वाचा :  Dhanteras 2022 : ज्वेलर्सकडून सोन्यावर बेस्ट ऑफर, कुठे करू शकता खरेदी पाहा सन उत्सवामध्ये महिलांना दाग दागिन्यांची मोठी हौस असते. मात्र, सोने चांदीच्या किंमती गगनाला भिडल्या असल्यामुळे प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करता येत नाही. यामुळे या जागी दागिन्यांवरती मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. यामुळे महिलांना या दागिन्यांची खरेदी करता येणार आहे, असंही किशोर अवताडे यांनी सांगितले. आम्ही सर्वसाधारण कुटुंबातून आहोत. पती आणि मला दोघांनाही कमी पगार असल्यामुळे मुलांच्या आणि आमच्या इच्छा पूर्ण करताना सोने चांदी खरेदी करणे शक्य होत नाही.  यामुळे आम्ही या सोन सखी या दुकानाच्या विशेष ऑफरचा लाभ घेऊन या ठिकाणाहून दागिने खरेदी केले आहेत, असं ग्राहक अर्चना सोनवणे यांनी सांगितले. कुठे कराल खरेदी ? तुम्हाला जर या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही औरंगाबाद शहरातील पैठण गेट भागामध्ये असलेल्या महालक्ष्मी साडी सेंटर समोर असलेल्या सोनसखी जेम्स अँड ज्वेलरी सेंटर या दुकानातून तुम्हाला हे खरेदी करता येणार आहे. संपर्क क्रमांक - 7304559627

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात