जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Diwali 2022 : दिवाळीत फराळाला बनवा पोडाची शंकरपाळी, पाहा Recipe Video

Diwali 2022 : दिवाळीत फराळाला बनवा पोडाची शंकरपाळी, पाहा Recipe Video

Diwali 2022 : दिवाळीत फराळाला बनवा पोडाची शंकरपाळी, पाहा Recipe Video

Diwali 2022 : या दिवाळीतील फराळासाठी पोडाची शंकरपाळी कशी करायची याची सोपी पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 21 ऑक्टोबर : वसुबारस ते भाऊबीज पर्यंत चालणारा दिवाळी हा सण आनंदाची शिदोरी सोबत आणतो. दिवाळीत घरोघरी फराळ बनवला जातो. धावपळ आणि धाकाधकीच्या जीवनात प्रत्येक रेसिपी सोपी कशी होईल याचा घरातील महिला प्रयत्न करत असतात. या दिवाळीतील फराळासाठी पोडाची शंकरपाळी कशी करायची याची सोपी पद्धत आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. प्रणिता कवठनकर यांनी ही रेसिपी शेअर केली आहे. साहित्य  मैदा - पाव किलो तेल - 6 चमचे चटणी - 2-3 टी स्पून मीठ - चवीनुसार शहाजीरे -  1 चमचा ओवा -  1 चमचा कसूरीमेथी - 2 चमचा कुस्करलेली कलोंजी - दीड चमचा तीळ - 1 चमचा तूप -  2 चमचे कॉर्नफ्लोअर - 1 चमचा कॉर्नफ्लोअर तूप आणि कॉर्नफ्लोवरचे मिश्रण करावे. ते संपल्यास पुन्हा याच मापात बनवून वापरावे. शंकरपाळे करण्याची कृती पोडाची शंकरपाळी बनवण्यासाठी पावकिलो मैदा एका भांड्यात घ्यावा. 6 चमचे तेल कडकडीत गरम करावं आणि ते मैद्यात मिसळून मोहन द्यावं. तेल आणि मैदा व्यवस्थित मिक्स करून घ्यावा. त्यानंतर त्यात चटणी 2-3 टी स्पून किंवा चवीनुसार टाकावी. मीठ सुद्धा चवीनुसार घालावे. शहाजिरे, ओवा, कलोंजी, तीळ हे पदार्थ योग्य त्या प्रमाणात घालावे. कसुरीमेथी थोडी कुस्करून घालावी आणि मैद्यात टाकलेले हे सर्व पदार्थ व्यवस्थित एकत्र करून घ्यावे. त्यानंतर त्यामध्ये पाणी घालून कणिक माळावी. ही कणिक जास्त मऊ होणार नाही याची काळजी घ्यावी. (कणिक कडक असू द्यावी). विशेष म्हणजे ही कणिक मळून थोडा वेळ ठेवण्याची गरज नाही. दिवाळीत बनवा आजवर कधीही न खालेल्ला दळाचा लाडू, पाहा Recipe Video या कणकेचे लहान गोळे करावे. गोळा पातळ लाटून घ्यावा त्यानंतर तूप व कॉर्नफ्लोअरचे सारण संपूर्ण पोळीवर पसरवावे आणि पोळीचे दोन भाग घडी करावे. वर आलेल्या भागावर सुद्धा तुप आणि कॉर्नफ्लोअरचे मिश्रण लावावे. ते रोल करून हलकं लाटण त्या रोलवर फिरवावं. आता या रोलचे सूरीने आडवे काप करावे आणि ते तेलात मंद आचेवर तेलात सोनेरी रंग येई पर्यंत तळून घ्यावे. हे विसरू नका! ही पोडाची तिखट शंकरपाळी पूर्ण थंड झाल्यावर अगदी खुसखुशीत आणि टेस्टी लागतात. याला टोमॅटो केचअप सोबत सुद्धा खाता येते. जास्त प्रमाणात बनवल्यास हवाबंद डब्यात ठेवावी. जेणेकरून मऊ होणार नाही. तसेच बनवताना प्रमाण हे मोजून घ्यावे. कणिक जास्त मऊ झाल्यास ही शंकरपाळी खुसखुशीत बनत नाहीत. ‘या’ हॉटेलमध्ये मिळते दिवाळी स्पेशल भाजणीची चकली, तब्बल 111 वर्षांची आहे परंपरा, Video शंकरपाळीला खुसखुशीतपणा कसा येतो? कणिक थोडी कडक मळलेली असते त्यामुळे पोडाची तिखट शंकरपाळी खुसखुशीत होतात. तसेच पोळीवर तूप व कॉर्नफ्लोअरचे सारण लावल्यामुळे सुद्धा ही अधिक टेस्टी आणि खुसखुशीत लागतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात