औरंगाबाद, 7 नोव्हेंबर : घरामध्ये असलेला ताण तणाव, आर्थिक अडचणी, लॉकडाऊनच्या काळात आलेला एकलकोंडेपणा, मोबाईलच्या अति वापरामुळे बाल मनोरुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. औरंगाबाद शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून बाल मनोरुग्णांच्या संख्येत 10 ते 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे पालकांनी वेळीच मुलांची काळजी घेण्याची गरज असल्याचं भारतीय मानसोपचार कमेटी सदस्य तज्ञ डॉ. मेराज कादरी यांनी सांगितले आहे. कोरोना संकटामुळे संपूर्ण जगावर बंधने आली होती. कोरोना वरती मात करण्यासाठी जगभरामध्ये लॉकडाऊन करावं लागलं. यामुळे प्रत्येक जण घरात होता. घरात राहून लहान मुलांवरती याचे दुष्परिणाम झाले आहेत. मुलांमध्ये एकलकोंडेपणा त्यासोबतच मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांमध्ये मानसिक आजाराची लक्षणे दिसून येत आहेत. औरंगाबाद शहरातील रुग्णालयांमध्ये 5 ते 15 वयोगटातील मुला - मुलींमध्ये मानसिक आजार दिसून येत आहे. यामुळे किशोरवयीन मुलांमध्ये देखील मनोरुग्णांचा समावेश होत आहे.
Aurangabad : मुलं कार्टूनसारखं बोलतात! काळजी नको, ‘हे’ करा उपाय, Videoमुलांना कसलाच ताण नसतांना मानसिक आजार का? लहान मुलांना कुठली जबाबदारी नसल्यामुळे त्यांना कशामुळे मानसिक ताणतणाव येणार हा प्रश्न तुम्हाला सहज पडू शकतो. मात्र, सभोवतालच्या परिसरामध्ये घडणाऱ्या घटना घरामध्ये होणारे संवाद व घडामोडींवरती मुलांचं लक्ष असतं. या घटनांचा व घडामोडींचा परिणाम या बालमनावरती चटकन होतो. पालकांमध्ये असलेला विसंवाद किंवा त्यांच्यामध्ये असलेले चिंतेचे वातावरण हे मुलांच्या मनावर परिणाम करणारं असतं. लॉकडाऊन नंतर घरांमध्ये आलेल्या आर्थिक अडचणी आणि याबद्दल चर्चा करणाऱ्या आई-वडिलांच्या गप्पा ऐकून मुलांच्या मनावर देखील याचा परिणाम होत आहे,असं मानसोपचार तज्ञ सांगतात.
मुलांमध्ये दिसणारी लक्षणे आई वडिलांचे न ऐकणं, चिडचिड करणं, मध्येच हिंसक वागणं, विनाकारण त्रास, राग येणे, चिडचिड करणे, बडबड करणे, किंवा अगदी शांत राहणं यासारखी लक्षण मुलांमध्ये दिसून येत आहेत. हे आहेत कारणे लॉकडाऊन दरम्यान लिहण्या वाचण्याची सवय तुटली, शाळेत बसण्याच्या सवयी तुटल्या, जुना अभ्यास राहिला, बॅकलॉग काढायचा आहे, मोबाईलचा अतिवापर, घरगुती भांडण, आई-वडिलांचे भांडण, घरातील आर्थिक चणचण, पालक करत असलेली चिंता इत्यादी गोष्टींचा परिणाम मुलांच्या बालमनावर होतो.
Aurangabad : टेन्शन संपलं! एका क्लिकवर मिळतील मुलांसंबंधीच्या प्रश्नांची उत्तर, Video
मुलांच्या या परिस्थितीवर मात करण्यासाठी मुलांची मानसिकता समजून घेऊन त्यांना हळूहळू यातून बाहेर काढणे गरजेचे आहे. त्यांच्यावर असलेल्या बर्डन ताण तणाव कमी करणे गरजेचे आहे. घरातील ताणतणाव मोबाईलचा अतिवापर आणि लॉकडाऊनच्या काळात एकटे राहिल्यामुळे मुलांमध्ये बाल मनोरुग्णांचे प्रमाण 10 ते 15 टक्क्यांनी वाढले आहे. तुमच्या मुलांच्या बाबतीत असं होत असेल तर तुम्ही तात्काळ मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत जेणेकरून भविष्यातील धोके टाळता येऊ शकतात, असंही डॉ.मेराज कादरी सांगतात.