जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Aurangabad : मुलं कार्टूनसारखं बोलतात! काळजी नको, 'हे' करा उपाय, Video

Aurangabad : मुलं कार्टूनसारखं बोलतात! काळजी नको, 'हे' करा उपाय, Video

औरंगाबाद शहरामध्ये कार्टून सारखं बोलण्याचे प्रमाण मुलांमध्ये दहा टक्क्यांनी वाढले आहे.

औरंगाबाद शहरामध्ये कार्टून सारखं बोलण्याचे प्रमाण मुलांमध्ये दहा टक्क्यांनी वाढले आहे.

Aurangabad : औरंगाबाद शहरामध्ये कार्टून सारखं बोलण्याचे प्रमाण मुलांमध्ये दहा टक्क्यांनी वाढले आहे.

  • -MIN READ Aurangabad,Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

    औरंगाबाद 13 ऑक्टोबर : घरामध्ये असताना मुलं कार्टून सारखा आवाज काढतात. त्यांच्या वागण्या बोलण्यातून चित्रपट, मालिका किंवा कार्टून सारखे लक्षणे दिसत आहेत. अश्या तक्रारी औरंगाबाद शहरातील मानसोपचार तज्ञांकडे वाढल्या आहेत. लॉकडाऊन पूर्वी पाच टक्के प्रमाण असलेल्या या तक्रारी दहा टक्क्यांनी वाढल्या असल्याचं घाटी रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांनी सांगितले आहे. लहान मुलाने रडू नये किंवा त्यांनी खेळत राहावं. यासाठी अनेकदा पालकांकडून मनोरंजनासाठी त्यांना मोबाईल हातात दिला जातो. मात्र, याचे विपरीत परिणाम आता दिसू लागले असून मुलाने बघितलेल्या व्हिडिओचं अनुकरण ते करताना दिसत आहेत. त्यांच्या वागण्यात आणि बोलण्यात चित्रपट, मालिका किंवा कार्टून मधील बघितलेला दृश्याचे अनुकरण मुलं करतात. याबाबतच्या तक्रारी लॉकडाऊनच्या नंतर दुपटीने वाढल्या आहेत. हेही वाचा :  World Sight Day 2022: डोळ्यात घाण/किडा गेल्यावर लगेच काय करावं? अनेकजण करतात ती चूक टाळा दोन वर्षांपूर्वी कोरोना संसर्गजन्य आजारामुळे संपूर्ण जग ठप्प झालं होतं. यामुळे सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले. दरम्यान, सर्व काही ठप्प असल्यामुळे शिक्षण व्यवस्था मात्र सुरू करावी लागली. प्रत्यक्षात वर्ग भरवणे शक्य नसल्यामुळे ऑनलाइन वर्ग भरवण्याचा पर्याय निवडण्यात आला. यासाठी मोबाईलचा वापर करून मुलं ऑनलाइन शिक्षण घेऊ लागली. यावेळी अभ्यासानंतर ही मुलं मोबाईलचा वापर करायला लागल्यामुळे बहुतांशी मुलांचा दिवस हा मोबाईल मध्येच गुंतवून राहिलेला होता. मर्यादापेक्षा  जास्त वेळ मोबाईल वापरून बघितलेले व्हिडिओज चित्रपट, मालिकां आणि कार्टून मधील डायलॉग मारण्याचे प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये वाढलं असल्याचे मानसोपचार तज्ञ डॉ. संदीप शिसोदे यांनी सांगितले. मुलांमध्ये हे लक्षणं आढळून येत आहेत कार्टून बघून मुलं कार्टून सारखं बोलत आहेत चित्रपट मालिकांचे डायलॉग मारत आहेत मोबाईल टीव्हीवर दाखवलेली जाहिरात वारंवार बोलत आहेत इशाऱ्यातून बोलणे, अबोल राहणे, एकच वाक्य परत परत बोलने. हेही वाचा :  मानवी दुधात आढळले प्लास्टिकचे सूक्ष्म कण; गरोदर महिला, स्तनदा मातांना संशोधकांनी दिला ‘हा’ सल्ला मुलांसोबत संवाद वाढवावा मुलांनी रडू नाही किंवा खेळत राहावं यासाठी मोबाईल किंवा टीव्ही सुरू करून देणं हा त्यावरचा पर्याय ठरत नाही असं केल्यामुळे मुलं कार्टून सारखं वागत आहेत. बोलत आहेत अशा तक्रारी आता वाढत आहेत. यामुळे पालकांनी मुलांना मोबाईल किंवा टीव्ही जास्त वेळ वापरू देऊ नये त्यापेक्षा पालकांनी मुलांसोबत संवाद वाढवावा. यातून मुलांवरती टीव्ही व मोबाईलचे दुष्परिणाम होणार नाही, असंही मानसोपचार तज्ञ डॉ.संदीप शिसोदे सांगतात.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात