औरंगाबाद, 20 नोव्हेंबर : महाराष्ट्रातल्या नेत्यांची वादग्रस्त वक्तव्य करण्याची मालिका काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. या यादीमध्ये आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांची भर पडली आहे. नुकत्याच ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश केलेल्या दिपाली सय्यद यांच्याबाबत खैरे यांनी औरंगाबादच्या महाप्रबोधन यात्रेत वादग्रस्त विधान केलं. दिपाली सय्यद यांचा उल्लेख खैरे यांनी लिपस्टीकवाली बाई म्हणून केला. याच सभेत चंद्रकांत खैरे यांनी अब्दुल सत्तार यांच्यावरही निशाणा साधला. ‘अब्दुल सत्तार संभाजीनगर म्हणत नसून औरंगाबाद म्हणतो, यावरून मी त्याला एकदा जिल्हाधिकारी कार्यालयात माईकने मारणार होतो,’ असंही खैरे म्हणाले. ’…तर काळा टोपीवाला असं बोललाच नसता’, सुषमा अंधारेंचा राज्यपालांवर घणाघात ‘काही दिवसांनी वैजापूरचे आमदार जेलमध्ये जाणार. जो स्वत:च्या भावजयीला मारहाण करतो तो आमदार कसला,’ असं म्हणत खैरे यांनी रमेश बोरनारे यांच्यावरही टीका केली. मी समांतर जलवाहिनी आणी आणि भाजपने अडवली, नाहीतर सर्वांना आता पाणी मिळालं असतं, असा आरोपही चंद्रकांत खैरे यांनी केला. दरम्यान चंद्रकांत खैरे बोलत असताना उपस्थितांकडून सुषमा अंधारे यांना बोलू द्या, अशी घोषणाबाजीही करण्यात आली. तेव्हा सभा पोलीस ठाण्यात पण घेऊ.. अंबादास दानवेंचा पुन्हा एकदा पोलिसांना दम
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.