मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

तेव्हा सभा पोलीस ठाण्यात पण घेऊ.. अंबादास दानवेंचा पुन्हा एकदा पोलिसांना दम

तेव्हा सभा पोलीस ठाण्यात पण घेऊ.. अंबादास दानवेंचा पुन्हा एकदा पोलिसांना दम

अंबादास दानवेंचा पुन्हा एकदा पोलिसांना दम

अंबादास दानवेंचा पुन्हा एकदा पोलिसांना दम

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पुन्हा एकदा पोलीस विभागाबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Rahul Punde

औरंगाबाद, 20 नोव्हेंबर : एक दिवसापूर्वीच पैठण येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सभेत बोलतांना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे पोलिसांबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. ही घटना ताजी असताना आता आणखी एक विधान दानवेंनी केल्याने नवा वाद उफाळण्याची शक्यता आहे. 'पोलीस चाटायचे कामे करतायत' असे विधान दानवे यांनी केलं होतं. महाप्रबोधन यात्रेतील सभेत ते बोलत होते. आज पुन्हा एकदा त्यांनी पोलीस विभागाला आव्हान दिलं आहे.

राज्यपाल कोश्यारी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान

अंबादास दानवे भाषणाला आल्यावर काही लोक म्हणाले, कोण आला रे कोण आला शिवसेनेचा वाघ आला. मात्र, यानंतर मी आल्यावर नाही तर चंद्रकांत खैरे आल्यानंतर वाघ आला म्हणा, असं सांगत दानवे यांनी भाषणाला सुरुवात केली. शिवसेना ऐऱ्यागैऱ्याची नाही. काल एकजण काळ्या टोपीवाला असं म्हणत राज्यपालांचा हारामखोर म्हणून उल्लेख दानवेंनी केला. यावेळी गुन्हा दाखल झाला तरी चालेल, असंही ते म्हणाले.

संदीपान भुमरे यांना आव्हान

उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षात शहरासाठी 2400 कोटी दिले. शिरसाठ यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादी औषधाला पण नाही. संदीपान भुमरे यांच्या 'सातव्या माळ्यावरून उडी मारील‌' या वक्तव्याची मिमिक्री केली. समोर येऊन चर्चा करा भुमरेंच्या साखर कारखान्यात मनीलॉन्ड्रींग कशी झाली दाखवून देतो, असं म्हणत भुमरे यांना पुन्हा एकदा दानवेंनी आव्हान दिलं आहे.

वाचा - शिंदे गटात जाणार का?; सुषमा अंधारे स्पष्टच बोलल्या

तेव्हा सभा पोलीस ठाण्यात पण घेऊ : दानवे

शहराला सुपर संभाजीनगर संकल्पना उद्धव ठाकरे यांनी दिली. या शहराच संभाजीनगर नाव शिवसेनेने केलं आहे. गुजरातच्या निवडणुकांमुळे प्रकल्प गुजरातला गेले. सरकारला बुलेट ट्रेन दिसते, पण शेतकऱ्यांचे अश्रू दिसत नाही. जेव्हा आम्ही सत्तेत येऊ, तेव्हा सभा पोलीस ठाण्यात पण घेऊ, असं म्हणत दानवे यांनी पोलिसांना पुन्हा एकदा इशार दिला आहे.

शनिवारचं प्रकरण काय आहे?

शनिवारच्या सभेत दानवे म्हणाले की, आमच्या सभेला येणाऱ्या गाड्यांच्या नंबरची नोंद केली जात आहे. येथील काही पोलीस देखील चापलूसी करतायत, चाटायचं काम करतायत. पण लक्षात ठेवा हे जास्त दिवस नसून, उद्या आम्हीपण येणार आहोत या जागेवर. आम्ही सभा घेत असलेल्या ठिकाणी आत्तापर्यंत किती सभा झाल्या आहेत, याचा रेकोर्ड काढून पाहा. पण तुम्हाला आता प्रश्न दिसत आहे. त्यामुळे पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करतायत, पगार मंत्री भुमरे यांचा घेत आहेत का? सरकारचा घेत आहेत. पोलिसांना सांगतोय मस्ती करू नका, मस्ती आमच्या अंगात देखील आहे. तर मस्ती कराल तर तुम्हाला सुद्धा धडा शिकवू, मी सर्वांच्या बाबत बोलत नाही, पण मोजक्या काही लोकांबद्दल बोलत असल्याचे देखील दानवे म्हणाले. मात्र दानवेंच्या या विधानामुळे पोलिसांच्या कुटुंबातील सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

First published:

Tags: Aurangabad, Shivsena