मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'...तर काळा टोपीवाला असं बोललाच नसता', सुषमा अंधारेंचा राज्यपालांवर घणाघात

'...तर काळा टोपीवाला असं बोललाच नसता', सुषमा अंधारेंचा राज्यपालांवर घणाघात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाप्रबोधन यात्रा ही औरंगाबादमध्ये होती. या यात्रेमध्ये शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप तसंच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad, India
  • Published by:  Shreyas

औरंगाबाद, 20 नोव्हेंबर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची महाप्रबोधन यात्रा ही औरंगाबादमध्ये होती. या यात्रेमध्ये शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी भाजप तसंच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेवर निशाणा साधला. एकनाथ भाऊंना तरी रिक्षावाल्यांची दु:ख कळली पाहिजेत, असा टोला सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला. तसंच अबकी बार सिर्फ और सिर्फ ठाकरे सरकार, अशी घोषणाही सुषमा अंधारे यांनी दिली.

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा उल्लेख सुषमा अंधारे यांनी सिलेंडरवर बसणारी बाई असा केला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचाही त्यांनी समाचार घेतला. 'आरएसएसच्या शाखेतून शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास सांगितला जातो. तेव्हाच प्रश्न विचारले असते तर आज काळा टोपीवाला असं बोलला नसता,' अशी टीका अंधारे यांनी केली.

'नुसतं डोळ्याला पाणी लावून नमो नमो करणं म्हणजे हिंदुत्व नव्हे. राज्यपाल निरपेक्ष असले पाहिजेत. आताचे राज्यपाल म्हणजे भाजपचे पूर्णवेळ कार्यकर्ते वाटतात. जर गडकरी भाजपला आदर्श वाटत असतील, तर मोदींसाठी गडकरींना अडगळीत का टाकलं? तेव्हा राज्यपाल कुठे गेले होते?' असा प्रश्नही सुषमा अंधारे यांनी विचारला.

'मोदी सत्तेत आल्यानंतर सावरकरांचा पुतळा उभारणे अपेक्षित होतं, तुम्ही काँग्रेसचे नेते वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारला,' असा टोलाही अंधारे यांनी लगावला. या सभेमध्ये अंधारे यांनी नितेश राणे यांचे 2015 सालचे सावरकरांविरोधातली ट्विटही वाचून दाखवली. आता त्यांच्या कणकवलीत जाऊन भाजपने आंदोलन करून दाखवावं, असं आव्हानही सुषमा अंधारेंनी दिलं.

राज ठाकरे स्टेपनी

महाप्रबोधन यात्रेच्या सभेत सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंवरही निशाणा साधला. राज ठाकरे यांना स्टेपनी म्हणून सरकारमध्ये ठेवलं आहे, त्यांना काय भोंगे वाजवायला ठेवलंय का? असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला.

तेव्हा भिडे गुरुजी कुठे होते?

मंगळसूत्र घातल्यावर गळा दाबल्यासारखा वाटतो, असं अमृता फडणवीस म्हणाल्या तेव्हा संभाजी भिडे गुरूजी कुठे होते? असा सवालही सुषमा अंधारे यांनी विचारला.

म्हणून शिरसाट यांना हार्ट अटॅक

संजय शिरसाट यांनी इतकी निष्ठा दाखवूनही त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली नाही, या तणावातून त्यांचं हृदय दुखावलं, असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला.

First published:

Tags: Governor bhagat singh, Shivsena