अविनाश कानडजे (औरंगाबाद) : गुजरातच्या सरकारच्या बसचा औरंगाबाद येथे अपघात झाला. गुजरात आगाराचे अहमदाबाद ते औरंगाबाद बस औरंगाबादवरून अहमदाबादकडे जात असताना कन्नडजवळ हा अपघात झाला. कन्नड गावाजवळील काश्मीरा हॉटेल समोर पादचाऱ्याला वाचवण्याच्या प्रयत्नात बस झाडाला जाऊन आदळली.
ही धडक एवढी गंभीर होती की बसचा समोरील भाग पूर्णपणे चुरा झालाय. या बसमधील अंदाजे 10 ते 15 प्रवासी जखमी झाले असून, जखमींवर कन्नड शहरातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
हे ही वाचा : VIDEO: 80 पेक्षा अधिक वर्षे जगतात या ठिकाणाचे लोक, काय आहे कारण?
दरम्यान मागच्या चार दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्याच्या डहाणू परिसरात मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कार आणि बसमध्ये भीषण टक्कर झाली. या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. कार गुजरातहून मुंबईकडे जात असताना हा अपघात झाल्याची माहिती पालघर पोलिसांनी दिली. कार चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बसला धडक दिल्याने ही घटना घडल्याचे सांगितलं.
मिळालेल्या माहितीनुसार, गाडी मुंबईच्या दिशेने निघाली होती. दुपारी साडेतीनच्या सुमारास कार चारोटी येथील महालक्ष्मी मंदिराजवळ महामार्गावर आली असता कार चालकाने लेन बदलल्याचे समजते. त्याचवेळी कार लक्झरी बसला धडकली. या अपघातात चालकासह कारमधील सर्वांचा जागीच मृत्यू झाला. पीडितांची ओळख पटवली जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हे ही वाचा : सैन्यात भरती करतो म्हणून भावाने फसवलं, तरूणाने व्हॉटस्अप स्टेटस ठेवत उचललं टोकाचं पाऊल
चारोटीजवळ या वर्षातील दुसरा अपघात
चारोटी व परिसरात या वर्षातील हा दुसरा अपघात आहे. 8 जानेवारी रोजी नालासोपारा येथे एका कुटुंबातील तीन जणांचा मृत्यू झाला होता, त्यात एका लहान मुलाचाही समावेश होता. त्यादरम्यान त्यांची कार महालक्ष्मी मंदिराजवळ कंटेनर ट्रकला धडकली होती. याचबरोबर टाटा सन्सचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्री यांचा चारोटीजवळ महामार्गावर गेल्या वर्षी 4 सप्टेंबर रोजी अपघातात मृत्यू झाला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Aurangabad, Aurangabad News, St bus accident