नवी दिल्ली, 3 फेब्रुवारी : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात लोकांना अनेक आजार जडत आहे. या वेगवेगल्या आणि नवीन आजारांमुळे लोकांचं आयुष्यही कमी होत चाललं आहे. अगदी कमी वयातही लोकांना या जगाचा निरोप घ्यावा लागतो. मात्र एक असंही ठिकाणा आहे जेथे लोक 80 वर्षापेक्षा जास्त काळ जगतात. हे वाचून तुमचेही डोळं उंचावले असतील. मात्र अलीकडेच एका यूट्यबरने हे अनोखे ठिकाण एक्सप्लोर केलं आहे. जपानमधील लोकांचे सरासरी वय 83 वर्षे आहे. त्याचवेळी, जपानमध्ये एक बेट आहे जे येथे राहणाऱ्या लोकांचे वय वाढवते असे म्हटले जाते. अलीकडेच या अनोख्या ठिकाणाला Drew Bins नावाच्या एका युट्युबरने भेट दिली. याविषयी एक व्हिडीओ शेअर केला करत त्याने तेथील लोकांविषयी सांगितलं आहे. ते म्हणाले की, या ठिकाणाचा पृथ्वीवरील सर्वात आरोग्यदायी ठिकाणांमध्ये समावेश आहे. शेवटी, जपानच्या ओकिनावा शहरात असे काय आहे? याबाबत त्यांनी येथे राहणाऱ्या लोकांना विचारले.
सुमारे 80 वर्षे वयाच्या एका महिलेने सांगितले की, येथे राहणारे लोक वारंवार ये-जा करतात. तो एका जागी बसत नाही. या महिलेने सांगितले की, तिची सासू 105 वर्षे जगली होती. यासोबतच युट्युबर 100 वर्षे वय असलेल्या महिलेलाही भेटला. ही महिला तिची कामे स्वतः करते. तिला जपानच्या पंतप्रधानांकडून प्रमाणपत्रही मिळाले होते. ओकिनावा येथे राहणाऱ्या एका जपानी मुलीने सांगितले येथील लोक अधिक निसर्गाच्या सानिध्यात राहतात. त्यामुळे त्यांचे आयुष्य जास्त आहे.
दरम्यान, ओकिनावाला जगातील सर्वात आरोग्यदायी ठिकाण म्हटलं जातं. येथील लोक सकाळी उठल्यापासूनच शारीरीक हालचालींना सुरुवात करतात. त्याचबरोबर तेथील लोक आपल्या खाण्यापण्याकडे विशेष लक्ष देतात. ओकिनावामध्ये कराटे शिकणाऱ्यांची संख्या जास्त आहे. ओकिनावा संपूर्णपणे नैसर्गिक सानिध्यात आहे. येथील समुद्र, हवामान, खूपच आकर्षक आहे. निसर्गाने वेढलेला असल्यामुळे ओकिनावाला इतर ठिकाणांपेक्षा अधिक वेगळं ऐणि आरोग्यदायी म्हटलं जातं.