अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर, 03 मार्च : छत्रपती संभाजीनगरमध्ये सैराटची पुनरावृत्ती घडली आहे. आपल्या मुलीवर प्रेम करायचा म्हणून मुलीच्या वडिलांनी तरुणाची क्रुरपणे हत्या केली आहे. या तरुणाच्या मृतदेहाचे वन्य प्राण्यांनी अक्षरश: लचके तोडले आहे. या घटनेमुळे या प्रकरणी मुलीचे आजोबा, वडील आणि काका यांना आरोपी म्हणून पोलिसांनी अटक केली आहे.
छत्रपती संभाजीनगरातील वैजापूरच्या भिवगाव शिवारात ही घटना घडली. सचिन प्रभाकर काळे असं मृत युवकाचे नाव आहे. विनायक नगरयेथील शाळेत दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या मयत सचिन काळे यांचे वर्गातील एका मुलीसोबत प्रेमप्रकरण होते. याबाबत कुटुंबातील सदस्यांना कल्पना नव्हती. तो 25 फेब्रुवारीला मुलीला भेटण्यासाठी गेला होता. पण तेव्हापासून तो बेपत्ता होता.
(रात्री 12 वा. मेसेज, प्रेयसीसोबत शरीरसंबंध; तेवढ्यात काकाचा फोन आला अन्...)
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी त्याचा मृतदेह सापडला. माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी सचिनचा एक हात तुटलेल्या अवस्थेत होता. भटक्या प्राण्यांनी त्याच्या शरीराचे लचके तोडले होते. पोलिसांनी अधिक तपास केला असता मुलीच्या वडील, काकासह आजोबाने केलेल्या मारहाणीत या मुलाचा मृत्यू झाला असल्याचे समोर आले. तर या प्रकरणी वैजापूर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.
(सोन्यासारखी बायको सोडून पैशाचा हव्यास! हुंडा देण्यास नकार दिला अन्.. विवाहितेसोबत भयानक कांड)
पोलिसांनी तपास केला असता, त्याचे प्रेम असलेल्या युवतीच्या कुटुंबीयांनी केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाला असल्याचं समोर आले. त्यानुसार पोलिसांनी माधव जंगले, दादासाहेब जंगले, सुनील यांना अटक केल्याची माहिती वैजापूर पोलिसांनी दिली.
मोबाईल गिफ्ट दिला अन् जीव गेला
सचिनचे आपल्याच वर्गातील एका मुलीवर प्रेम होते. याबाबत त्याच्या कुटुंबीयांना माहिती नव्हती. मात्र एकमेकांना भेटणे आणि बोलणे सोईस्कर व्हावे याकरिता काही दिवसांपूर्वी त्याने मुलीला मोबाईल घेऊन दिला होता. 25 फेब्रुवारी रोजी तो मुलीला भेटायला गेला होता. पण याची माहिती मुलीच्या कुटुंबातील सदस्यांना मिळाली. त्यामुळे मुलीचे वडील, काका आणि आजोबाने सचिनला बेदम मारहाण केली. याच मारहाणीत त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह शेतात टाकण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. चार दिवसांनी सचिनचा मृतदेह आढळून आल्यावर हे सर्व प्रकरण समोर आले. मात्र आपल्या मुलीवर प्रेम करणाऱ्या काटा काढण्याची ही घटना अगदी सैराट चित्रपटाप्रमाणे समोर आल्याने छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.