विजय देसाई, प्रतिनिधी मीरा भाईंदर, 27 फेब्रुवारी : मोठ्या थाटामाटात लग्न लावून दिल्यानंतरही विवाहितेचा माहेरहून पैसे आणण्यासाठी छळ करण्यात आला. सततच्या मागणीला कंटाळून माहेरच्यांनी पैसे देण्यास नकार दिला. यावर सासरच्या लोकांनी विवाहितेला ठार मारुन तिच्या आत्महत्येचा बनाव रचला असल्याचा आरोप मृत महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. मीरा रोड येथील एका उच्चशिक्षित कुटुंबात ही घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी मीरा रोडच्या काशीमीरा पोलीस ठाण्यात सासरच्या लोकांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. काशिमिरा पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी 3 पथक रवाना केली आहेत. एका उच्च शिक्षित कुटुंबाकडून अशा प्रकारच्या घटनेमुळे खळबळ माजली आहे. फोटोत दिसणारी निरागस हसरी अस्मिता हे जग सोडून गेली आहे. हुंड्यापाई तिचा तिच्या सासरच्या मंडळीनी जीव घेतल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. आपली मुलगी मोठ्या घरात जावी ही प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. त्यासाठी ते काहीही करायला तयार असतात. अस्मिताने एमसीएपर्यंत शिक्षण घेतलं होतं. ती नोकरीही करत होती. वाचा - विवाहीत प्रेयसी माहेरी येताच डाव साधला; प्रेमाचा भयानक शेवट, पोलीसही हादरे काय आहे प्रकरण? उत्तर प्रदेशातील एका कुटुंबात अमर मिश्रा यांनी त्यांची मुलगी अस्मिता हिचा विवाह 20 नोव्हेंबर 2021 मध्ये मोठ्या थाटामाटात अभय मिश्रासोबत लावून दिले. काही दिवस छान गेले. मात्र, त्यानंतर घरच्यांनी अस्मिताला घरून पैसे आणण्यासाठी तगादा लावला. अस्मिताचा पती अभय हा इंजिनिअर असून एका मोठ्या बिल्डरकडे कामाला असल्याचे सांगून मुंबईच्या जुहूमध्ये अलिशान घर असल्याचे सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात फसवणूक झाल्याचे अस्मिताच्या लक्षात आल्यानंतर तिने आपल्या आईला सांगितले. वडिलांनी पुन्हा तिला पैसे पाठवले. परंतु, त्या पैशांनी त्यांची हाव भागली नाही. त्याला अस्मिताच्या वडिलाचं घरे पाहिजे होतं. पण घर मिळत नसल्याचे पाहून अभयने माझ वय अजून आहे. मी अजून लग्न करू शकतो असे सांगून तिला माहेरी सोडले. तेव्हा अस्मिताच्या वडिलांनी आम्ही लग्नात घातलेले दागिने व सर्व वस्तू आणून दे सांगितल्यावर अस्मिताचा पती अभयने सासऱ्यांची माफी मागून घेवून गेला.
आम्ही कॉलेजपासून खास मैत्रिणी होतो. ती सर्व गोष्टी मला सांगत होती. तो तिच्या चारित्र्यावर सतत संशय घेत होता. अस्मिता कधीही आत्महत्या करणारी मुलगी नव्हती, अशी प्रतिक्रिया अस्मिताची मैत्रीण शिवानी कांबळे हिने दिली आहे. दरम्यान अस्मिताच्या वडिलांनी अभय मिश्रा आणि त्यांच्या कुटुंबीयांवर हत्या केल्याचा आरोप केला आहे. अस्मिताचा पती अभय मिश्रा, सासरे मनीष मिश्रा, सासू प्रेमलता मिश्रा, दीर जयराज मिश्रा, नणंद पायल, पोर्णिमा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांच्या शोधासाठी 3 पथक रवाना केल्याचे काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप कदम यांनी सांगितले.

)







