जालना, 15 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस अपघाताच्याही घटना सातत्याने समोर येत आहेत. त्यातच आज जालना जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बैलगाडी आणि दुचाकीच्या धडकेत महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. भोकरदन रोडवरील राजूर येथे ही दुर्घटना घडली. काय आहे संपूर्ण घटना - बैलगाडी आणि दुचाकीच्या धडकेत एका महिला पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सुनिता ईश्वरसिंग ढोबाळ असे अपघातात मृत्यू झालेल्या या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. ढोबाळ या त्यांच्या पतीच्या निधनानंतर त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर पोलीस खात्यात भरती झाल्या होत्या. सुनिता या त्यांच्या मुलासह दुचाकीवर मूळ गावाहून जालना येथे कर्तव्यावर जात होत्या. यावेळी त्यांचा मुलगा त्यांच्यासोबत होता. तसेच तो ही दुचाकी चालवत होता. दरम्यान, राजूरजवळ बैलगाडीला त्यांची दुचाकी धडकली. या अपघातात सुनिता ढोबाळ यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच या अपघातात त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्या भोकरदन तालुक्यातील इब्राहिमपूर येथील रहिवासी होत्या. मृत पोलीस कर्मचारी सुनिता ईश्वरसिंग ढोबाळ यांच्या पश्चात दोन मुले आणि एक मुलगी आहे. दरम्यान त्यांच्या अपघाती निधनाची बातमी समजताच पोलील दलात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. हेही वाचा - लग्नाचे आमिष देऊन 23 वर्षीय वार्डबॉयचे 30 वर्षाच्या नर्ससोबत धक्कादायक कृत्य, सतत दोन वर्ष… दुचाकीचे टायर फुटलं अन् धक्कादायक घडलं - औरंगाबादमध्ये संक्रांतीच्या दिवशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. औरंगाबादजवळ असणाऱ्या बिडकीन रोडवर बिडकीन औद्यागिक परिसरात निलजगाववरून बिडकीनच्या दिशेने येत असताना बिडकीन औद्यागिक परिसरात दुचाकीचा अपघात झाला. अपघातात चालकाचा जागेवरच मृत्यू झाला आहे. वळण रस्त्यावर रोडच्याकडेला असलेल्या कठड्याला, रस्ता लक्षात न आल्याने भारधाव वेगात जाऊन धडकली ही धडक इतकी जबरदस्त होती की, दुचाकीचे पुढचे टायर, शॉकअपचे तुकडे झाले. या अपघातात दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या सिमेंट कठड्याला धडकल्याने डोक्याला दुखापत झाली. यामध्ये दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.