Home /News /maharashtra /

उद्धव ठाकरेंची साथ सोडताना, शिंदे गटात जाताना डोळ्यांमध्ये अश्रू का आले? खोतकरांनी सांगितलं कारण

उद्धव ठाकरेंची साथ सोडताना, शिंदे गटात जाताना डोळ्यांमध्ये अश्रू का आले? खोतकरांनी सांगितलं कारण

उद्धव ठाकरेंची साथ सोडताना, शिंदे गटात जाताना डोळ्यांमध्ये अश्रू का आले? यामागचं कारण अर्जुन खोतकर यांनी आज भर सभेत सांगितलं आहे.

    मुंबई, 31 जुलै : शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी शनिवारी (30 जुलै) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला. शिंदे गटाला पाठिंबा देण्याआधी खोतकर यांनी आपली स्पष्ट भूमिका मांडली नव्हती. पण ते शिंदे गटात जाणार असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. खोतकरांनी आपण आधी कार्यकर्त्यांशी चर्चा करुन निर्णय घेवू, अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर खोतकरांनी शनिवारी अखेर शिंदे गटाला पाठिंबा दिला होता. यावेळी त्यांचा चेहरा अतिशय नाराज दिसत होता. त्यामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं. खोतकर हे कुणाच्या तरी दबावाखाली शिंदे गटात जात असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. विशेषत: खोतकरांच्या विरोधात जालना जिल्हा सहकारी बँक प्रकरणी ईडीकडून कारवाई सुरु होती. त्यामुळे ईडीच्या भीतीने ते शिंदे गटासोबत जात असल्याच्या चर्चा आहेत. पण खोतकरांनी त्यावर आज भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. या दरम्यान आमदार अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड या मतदासंघात आज मुख्यमंत्र्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं. तसेच सिल्लोडमध्ये मुख्यमंत्र्यांचा सभेचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात अर्जुन खोतकरांनी भाषण केलं. यावेळी त्यांनी आपण कुणाच्याही दबावाला बळी पडून शिंदे गटात सहभागी झालेलो नाही, असं खोतकरांनी स्पष्ट केलं. तसेच अब्दुल सत्तारांनी जीव ओवाळून टाकणारी माणसं कमावली, अशा शब्दांत कौतुक केलं. (राऊतांवरील कारवाईनंतर अस्लम शेख फडणवीसांच्या भेटीला, किरीट सोमय्यांनी केले होते 200 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप) मला आता सांगितलं पाहिजे की, काल माझ्या समर्थनाची घोषणा काल केली. समर्थन करत असताना मी काल भावनिक झालो. माझ्या डोळ्यांमध्ये अश्रूही आले. पण हे अश्रू कुणाच्या दबावापोटी नव्हते. ते अश्रू ईडीच्या दबावापोटी होते. मी भावनिक झाल्यामुळे ते अश्रू डोळ्यांवर आले, असं अर्जुन खोतकर म्हणाले. मी काल निर्णय घेतला आणि आज 5 हजार फॉर्म सुपूर्द केला आहे, असंदेखील ते यावेळी म्हणाले. "गर्भ तांदळाएवढा जरी असला तरी नऊ महिन्यांमध्ये तो पूर्ण होतो आणि बाळाचा जन्म होतो. निश्चितपणे या महाराष्ट्राच्या भूमीवर पुन्हा एकदा शिंदे नावाचा जन्म झालेला आहे. हे बाळ शिवसेनेला महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम केल्याशिवाय राहणार नाही", असं अर्जुन खोतकर म्हणाले.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Eknath Shinde, Shiv sena

    पुढील बातम्या