मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Aurangabad : रस्ते अपघातात रोज 3 जणांचा मृत्यू, गाडी चालवताना घ्या 'ही' काळजी

Aurangabad : रस्ते अपघातात रोज 3 जणांचा मृत्यू, गाडी चालवताना घ्या 'ही' काळजी

औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वर्षभरामध्ये 909 जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वर्षभरामध्ये 909 जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वर्षभरामध्ये 909 जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे.

औरंगाबाद, 16 सप्टेंबर : दिवसेंदिवस वाहनांची संख्या वाढत आहे. यामुळे रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांचे प्रमाण देखील वाढले आहे. राज्यात गेल्या वर्षभरात 58 हजार 233 जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. यात तब्बल 47 हजार 180 पुरुष आणि 11 हजार 53 महिलांचा समावेश आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यामध्ये वर्षभरामध्ये 909 जणांचा अपघातात मृत्यू झाला आहे. यात 742 पुरूष आणि 167 महिलांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी दिली आहे. गेल्यावर्षी 2021 मध्ये औरंगाबाद शहरात अपघातात मृत्यू झालेल्याची संख्या 973 इतकी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी अपघातात मृत्यू होण्याच्या संख्येत काही प्रमाणात घट झालेली आहे. मात्र, यामध्ये सर्वाधिक 6 रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात अपघात झाले असून या रस्त्यावरती वाहने सावकाश चालवण्याचे आवाहन पोलीस  प्रशानाकडून करण्यात आले आहे. सर्वाधिक अपघात होणारे स्थळ केंब्रिज चौक ते पैठण रोड बिडकिन ढोरकिन ते वाळूज लिंक रोड केंब्रिज चौक ते नगर रोड पंढरपूर वाळूज एमआयडीसी ते साजापूर रोड सोलापूर धुळे महामार्ग दौलताबाद पडेगाव रोड बीड बायपास रोड हेही वाचा : मराठवाडा मुक्ती दिन: स्मारक दुरूस्तीचे 72 कोटी अद्याप कागदावरच! शिंदे सरकारवर गंभीर आरोप अपघाताची कारणे वाहने वेगात चालवणे वाहने विरुद्ध दिशेने चालवणे सीटबेल्ट न लावणे हेल्मेट न वापरणे रस्त्यांच्या नियमांच पालन न करणे मद्यपान करून वाहने चालवणे वाहने चालवताना हेडफोन वापरणे इत्यादी कारणे देखील या अपघातांना कारणीभूत आहेत. हेही वाचा : Video : शिक्षणासाठी जीव धोक्यात, मुलांना कडेवर घेऊन नदीतून करावा लागतो प्रवास नियमांचे पालन केल्यास अपघात कमी वाहने चालवताना दुचाकी व चारचाकी वाहन चालकांनी नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. वाहन चालवताना सीटबेल्ट लावणे, हेल्मेट लावणे व मद्यपान न करणे हे नियम पाळणे गरजेचे आहे. वाहतूक विभागातर्फे सांगण्यात आलेल्या नियमांचे पालन झाल्यास अपघातांची संख्या कमी होऊ शकते असं पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांनी सांगितले.
First published:

Tags: Accident, Aurangabad, Aurangabad News

पुढील बातम्या