मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मराठवाडा मुक्ती दिन: स्मारक दुरूस्तीचे 72 कोटी अद्याप कागदावरच! शिंदे सरकारवर गंभीर आरोप

मराठवाडा मुक्ती दिन: स्मारक दुरूस्तीचे 72 कोटी अद्याप कागदावरच! शिंदे सरकारवर गंभीर आरोप

मराठवाड्याच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष शनिवार (17 सप्टेंबर) सुरू होत आहे. मुक्ती दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं राज्यातील एकनाथ शिंदे सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

मराठवाड्याच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष शनिवार (17 सप्टेंबर) सुरू होत आहे. मुक्ती दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं राज्यातील एकनाथ शिंदे सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

मराठवाड्याच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष शनिवार (17 सप्टेंबर) सुरू होत आहे. मुक्ती दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं राज्यातील एकनाथ शिंदे सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

औरंगाबाद, 16 सप्टेंबर :  देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर एक वर्षांनी 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त झाला. मराठवाड्याच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष शनिवार (17 सप्टेंबर) सुरू होत आहे. मुक्ती दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं राज्यातील एकनाथ शिंदे सरकारवर गंभीर आरोप केला आहे. काय आहे आरोप? महाविकास आघाडी सरकारने मराठवाडा विभागातील 55 स्मारकांच्या दुरुस्तीसह स्मारक परिसरात अभ्यासिका सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी 72 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला परंतु सत्ता बदलाच्या प्रक्रियेनंतर हा निर्णय कागदावरच राहिला आहे, असा आरोप शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. मराठवाडा मुक्ती संग्रामात अनेक स्वातंत्र्य सैनिकांना जिवाचं  बलिदान दिलं. या संग्रामात हुतात्मा झालेल्या 55 सैनिकांचे स्मारकं मराठवाड्यातील 8 जिल्ह्यांमध्ये उभारण्यात आली आहेत. संपूर्ण मराठवाड्याचा गौरव असलेल्या या हुतात्मांच्या स्मारकाची सध्या दुरावस्ता झाली आहे. त्यामुळे  या स्मारकांची दुरुस्ती करून त्या ठिकाणी अभ्यासिका सुरू करावी असा निर्णय तत्कालीन राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेतला होता. त्यासाठी 72 कोटी निधी मंजूर करण्यात आला होता. मंजूर करण्यात आला. तसंच हा निधी जिल्ह्यानुसार देण्याचे निश्चित करण्यात आले होते.  त्यानंतर राज्यात सत्ताबदल झाला आणि महाविकास आघाडी सरकारनं मंजूर केलेला निधी कागदावरच राहिल्याचा आरोप दानवे यांनी केला. 'मराठवाडा मुक्ती संग्राम'वरून राजकीय नाट्य, मुख्यमंत्र्यांनी कार्यक्रम बदलला तेलंगणा,कर्नाटकमध्ये उत्सव साजरा केला जात आहे. मराठवाड्यावर मात्र अन्याय होत आहे. केंद्र सरकारने देखील तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये स्वतंत्र व्यवस्था केली आहे. मराठवाड्या बाबतीत मात्र तसं काही झालं नाही. उध्दव ठाकरे सरकारनं 72 कोटी मंजूर केले. मात्र, सत्ता पालट झाल्यानंतर त्यांनी काही केलं नाही. त्या पैशांचं काय  करायचं आतापर्यंत जाहीर केले नाही. शिंदे फडणवीस सरकार मराठवाड्यावर जाणून-बुजून अन्याय करत आहे,' अशी टीकाही दानवे यांनी केला आहे. लवकरच काम होईल महाविकास आघाडीच्या काळामध्ये ठाकरे सरकारने मराठवाडा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यवीरांच्या स्मारकांसाठी 72 कोटी फक्त मंजूर केले होते. त्यामध्ये काहीही नव्हतं मात्र, या संदर्भात आम्ही अधिक माहिती घेऊन यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी समाविष्ट करणार आहेत. या संदर्भात लवकरच काम पूर्ण होईल असं आश्वासन  सहकारमंत्री आमदार अतुल सावे यांनी दिलं आहे.
First published:

Tags: Aurangabad, Cm eknath shinde, Marathwada, Shivsena

पुढील बातम्या