जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / कुठे उसाच्या फडात तर कुठे शेतात, एकाच दिवशी आढळले 3 मृतदेह, औरंगाबाद हादरलं

कुठे उसाच्या फडात तर कुठे शेतात, एकाच दिवशी आढळले 3 मृतदेह, औरंगाबाद हादरलं

 कन्नड शहरातील न्यू हायस्कुल शाळेच्या पाठीमागे भाऊसाहेब कदम यांच्या उसाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे.

कन्नड शहरातील न्यू हायस्कुल शाळेच्या पाठीमागे भाऊसाहेब कदम यांच्या उसाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे.

कन्नड शहरातील न्यू हायस्कुल शाळेच्या पाठीमागे भाऊसाहेब कदम यांच्या उसाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे.

  • -MIN READ Aurangabad,Aurangabad,Maharashtra
  • Last Updated :

अविनाश कानडजे, प्रतिनिधी औरंगाबाद, 02 जानेवारी : औरंगाबादमध्ये दोन दिवसांपूर्वीच 3 जणांनी एकाच दिवशी आत्महत्या केल्याची घटना ताजी असताना आज एकाच दिवशी 3 मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कन्नड शहरातील न्यू हायस्कुल शाळेच्या पाठीमागे भाऊसाहेब कदम यांच्या उसाच्या शेतात कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. कदम यांच्या शेतात ऊसतोड सुरू असतांना दुर्गंधी पसरल्याने याचा उलगडा झाला. शेतकऱ्याने पोलिसांना माहिती देताच पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले. हा मृतदेह दहा ते बारा दिवसांअगोदर आणून टाकल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. (आधी शारीरिक संबंध ठेवले मग 51 वेळा वार करून प्रेयसीची हत्या, 1000 CCTV फुटेज तपासून पोलिसांनी शोधलं हत्येचं कारण) तर दुसरा एक व्यक्तीचा मृतदेह हा गंगापूर तालुक्यातील पेंढापूर फाट्याजवळ एका शेतात अर्धनग्न अवस्थेत आढळून आला आहे. या मृतदेहाची देखील ओळख अजून पटलेली नाही. विशेष म्हणजे, हे दोन्हीही मृतदेह उसाच्या शेतात मिळून आले. तर तिसरा मृतदेह औरंगाबादेतील उद्योग नगरी ओळख असलेल्या वाळूज परिसरातील गरवारे कंपनीच्या गोडाऊन जवळ आढळून आला आहे. हा 32 वर्षाच्या व्यक्तीचा मृतदेह आहे. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. ( चाकात अडकलेली तरुणी, यू-टर्न घेताना दिसली कार…पहाटे नेमकं काय घडलं? नव्या सीसीटीव्ही VIDEO मधून मोठा खुलासा ) पार्टीसाठी शेतात जाणाऱ्या तरुणावर बिबट्याचा हल्ला; हल्ल्यात तरुणाचा मृत्यू दरम्यान, सिल्लोड तालुक्यातील रेलगाव येथे रात्री आठ वाजता एका तरुणाचा मृतदेह शेतात आढळून आल्याने गावात खळबळ उडाली आहे. तरुणाच्या मृतदेहाची अवस्था पाहून या तरुणाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी सिल्लोड येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच तरुणाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात