Home /News /maharashtra /

BREAKING: चरस आणि एमडी ड्रग्सचा साठा जप्त, औरंगाबाद पोलिसांची मोठी कारवाई

BREAKING: चरस आणि एमडी ड्रग्सचा साठा जप्त, औरंगाबाद पोलिसांची मोठी कारवाई

HIGH Trailer

HIGH Trailer

पंचवटी चौकात चरस आणि एमडी (मॅफो ड्रोन) ड्रग्सचा साठा जप्त

सचिन जिरे, (प्रतिनिधी) औरंगाबाद, 29 सप्टेंबर: बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू आणि बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणी अंमलीविरोधी पथकाकडून (NCB) चौकशीचं सत्र सुरूच आहे. या चौकशीमुळे बॉलिवूडमधील ड्रग्स घेणाऱ्या सेलिब्रिटींची झोप उडाली आहे. त्यात औरंगाबाद पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. शहरातील पंचवटी चौकात चरस आणि एमडी (मॅफो ड्रोन) ड्रग्सचा साठा जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत. नुरोद्दीन बदरोद्दीन सय्यद , असिक अली मुसा कुरेशी अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. हेही वाचा...उपराजधानी हादरली! नागपुरात प्रियकरासमोरच अल्पवयीन मुलीवर तिघांकडून गॅंगरेप मुंबईहून औरंगाबादेत आणलेला एमडी ड्रग्स आणि चरस एका चारचाकी वाहनातून वेदांतनगर पोलिसांनी मंगळवारी पंचवटी चौकातून जप्त केले आहे. ड्रग्स साठा शहरात विक्रीसाठी आणण्यात आला असावा, असा संशय पोलीस निरीक्षक रामेश्वर रोडगे यांनी व्यक्त केली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवारी सकाळी स्कॉर्पिओ वाहनातून अंमली पदार्थ आणले जात असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती. पोलिसांनी पंचवटी चौकात सापळा रचून ती चारचाकी वाहन थांबवलं. त्या गाडीची झडती घेतली असता त्यात एमडी नावाच्या ड्रग्सच्या 13 पुड्या व चरस या अंमली पदार्थाच्या 25 पुड्या आढळून आल्या. ळ्या बाजारात या ड्रग्स किंमत एक कोटी रुपयांच्या जवळपास आहे. या प्रकरणी दोन्ही आरोपी सहित एक वाहन पोलिसांनी जप्त केली आहे. वेदांत नगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक  रामेश्वर रोडगे यांनी दिली आहे. ड्रग्स घेणाऱ्या सेलिब्रिटींची उडणार झोप... दरम्यान, सुशांत सिंह राजपूत मृत्यू आणि बॉलिवूड ड्रग्स कनेक्शन प्रकरणी अंमलीविरोधी पथकाकडून (NCB) चौकशीचे सत्र सुरूच आहे. या प्रकरणी आता NCB च्या ताब्यात तब्बल 45 फोन हाती लागले आहे. या फोनमध्ये अनेक सेलिब्रिटींची नाव असल्याची शक्यता आहे. सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाची चौकशी सुरू असताना ड्रग्स घेत असल्याचा खुलासा झाला. त्यानंतर रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली. त्यानंतर अंमली विरोधी पथकाने बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनचा तपास सुरू केला आहे. आतापर्यंत दीपिका पदुकोण,श्रद्धा कपूर, सारा अली खान यांची चौकशी करण्यात आली आहे. अंमली विरोधी पथकाने आतापर्यंत 45 फोन ताब्यात घेतले आहे. या फोनची तपासणी सध्या सुरू आहे. या फोन्समुळे बॉलिवूडमधील ड्रग्स घेणाऱ्यांची मोठी यादी समोर येण्याची शक्यता आहे. 45 फोनपैकी 15 मोबाइल फोनची तपासणी पूर्ण झाली असून त्याचा रिपोर्ट हा NCB ला मिळाला आहे. या आधारे आता NCB तपास करत आहे. उर्वरीत 30 मोबाइल फोनची तपासणी सुरू आहे. त्यांचा रिपोर्ट आल्यावर पुढील तपासाची दिशा ठरणार आहे. त्यामुळे सारा अली खान, श्रद्धा, दीपिका, करिश्मा,जया शहा यांच्या मोबाइलचे रिपोर्ट हे महत्त्वाचे ठरणार आहे. हेही वाचा...आई आणि भाऊ रात्री कामाला गेले, पत्नी घरी असताना झोपेतच मयूरसोबत घडले भीषण... आतापर्यंतच्या सर्व जणांचे जबाब घेण्यात आले आहे. यासोबतचं सर्व ड्रग्स पॅडलर्सचा जबाबही रिव्ह्यू करण्यात येईल. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फोनवर डंप डाटा येण्यापूर्वी जबाब रिव्ह्यू केल्यानंतर येणाऱ्या निकालानुसार पुढील रणनीती ठरविण्यात येईल. यामध्ये कॉल डिटेल्स, एसएमएस, व्हॉट्सअॅप चॅट यासर्वांचा तपास केला जाईल. 2017 ते 2020 पर्यंत डंप डाटा तपासण्यात येईल. हे सर्व इतकं सोपं नाही. यामध्ये अधिक काळ लागू शकतो. सोबतच यादरम्यान, जर काही सुगावा लागला तर कारवाई करण्यात येईल.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Aurangabad

पुढील बातम्या