आनिस शेख, प्रतिनिधी देहू रोड, 29 सप्टेंबर : कौटुंबिक वादातून एका 28 वर्षीय तरूणाची राहत्या घरात निर्घृणपणे हत्या झाल्याची धक्कादायक घटना देहुरोड येथील मामुर्डी गावात घडली आहे. मयूर गोविंद गायकवाड असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. या प्रकरणी मयूरच्या पत्नीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दीड वर्षांपूर्वी मयूर याचे लग्न झाले होते. घरात आई,लहान भाऊ तसंच बायको सोबत तो राहात होता. आई आणि भाऊ रात्रपाळीला कामाला गेले असताना पहाटेच्या वेळेस घरात कोणीही नसल्याची खात्री करून हल्लेखोराने मयूरचा गळा चिरून आणि डोक्यावर जोरदार आघात करून खून केल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. संभाजीराजेंनी उघडकीस आणला धक्कादायक प्रकार, रायगडावरील ‘रोपवे’ वादाच्या भोवऱ्यात घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळावर दाखल होऊन पंचनामा केला. मयूरचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असता कौटुंबिक वादातून मयूरचा खून झाला असावा असा संशय वर्तवला होता. त्यामुळे चौकशीसाठी त्याच्या पत्नीला ताब्यात घेण्यात आले आहे. कृषी विधेयकावरून महाविकास आघाडीत वाद? दोन महिन्यांपूर्वीच काढला होता आदेश पहाटे घडलेल्या खूना संदर्भात काही महत्त्वाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले असल्याने लवकरच या प्रकरणा उलगडा होण्याची शक्यता पोलिसांकडून जात वर्तविली आहे. दोन दिवसांपूर्वीच अनैतिक प्रेमसंबंधातून तरुणीचा खून करून मृतदेह आदर्शनगर येथील पाण्याच्या खदानीत टाकण्यात आलेले प्रकरण ताजे असतानाच आज पुन्हा खूनाच्या घटनेमुळे देहुरोड शहर हादरले आहे. तीन दिवसांतील खून होण्याची ही दुसरी घटना आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.