प्रेमात अडथळा बनला मामा, प्रियकरानं मित्रांच्या मदतीनं असा काढला काटा

प्रेमात अडथळा बनला मामा, प्रियकरानं मित्रांच्या मदतीनं असा काढला काटा

मित्रांच्या मदतीनं प्रेयसीच्या मामाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

  • Share this:

दरभंगा, 11 जून : प्रेमात अडसरतील अडसर दूर करण्यासाठी प्रेमी युगुलानं मित्रांच्या मदतीनं प्रेयसीच्या मामाची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारच्या दरभंगा परिसरात ही घटना घडली. मृतक नाझीम यांच्यामुळे दोघांनाही भेटण्यास आणि बोलण्यातही अडथळे येत होते. नाझीम यांच्यावर नजर ठेवून असल्यानं दोघांनाही एकमेकांना भेटता येत नव्हते. नाझीम यांच्या वागण्याचा बैजूला संताप आला आणि त्यांच्यात वाद सुरू झाले. हा वाद विकोपाल गेला आणि बैजूनं प्रेयसीच्या मामाची निर्घृण हत्या केली.

एसपी योगेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार ही हत्या प्रेम प्रकरणातून करण्यात आली आहे. मृतक मामाने बैजूला तरुणीसोबत न बोलण्यास समजावलं. जेव्हा बैजूनं ऐकलं नाही तेव्हा वाद वाढला आणि हाणामारीपर्यंत प्रकरण पोहोचलं. बैजूनं आपल्या मित्रांसोबत हत्येचा कट रचून 8 जून रोजी तरुणीच्या मामाचा काटा काढला. या प्रकऱणी बैजू कुमार उर्फ ​​बैजनाथ कुमार, संजीत कुमार, गुरुदेव कुमार यांना अटक करण्यात आल्याची माहिती सिटी एसपी यांनी दिली. त्यांच्याकडील सर्व साहित्य ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे.

हे वाचा-महिलेकडून जबरदस्तीनं वसूल केला कर्जाचा हफ्ता, कंपनीला शिवसैनिकांनी शिकवला धडा

8 जूनला रात्री नाझीम आपले दुकान बंद करून घरी परतत असताना बैजूनं आपल्या तीन मित्रांच्या मदतीनं मामाच्या डोक्यावर रॉडनं हल्ला केला. त्यानंतर गळा चिरून हत्या करण्यात आली. हत्येनंतर मामाच्या मृतदेहाची चौघांनी मिळून विल्हेवाट लावली. पोलिसांना या हत्येची माहिती मिळताच तपास करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

हे वाचा-टीव्हीवर कार्टून बघण्यास आईनं केला विरोध, पुण्यात 14 वर्षीय मुलानं घेतला गळफास

हे वाचा-लग्नास नकार दिला म्हणून भाच्यानं मामाचीच मुलगी पळवली, लपवलं ऊसाच्या फडात

संपादन- क्रांती कानेटकर

First published: June 11, 2020, 9:24 AM IST

ताज्या बातम्या