मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गॅस कटरने फोडले एटीएम मशीन, तब्बल साडे 9 लाखांची रक्कम घेऊन चोरटे पसार!

गॅस कटरने फोडले एटीएम मशीन, तब्बल साडे 9 लाखांची रक्कम घेऊन चोरटे पसार!


गॅस कटरच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांत या एटीएम मशीन उघडले आणि 9 लाख 55 हजार रुपयांची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले.

गॅस कटरच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांत या एटीएम मशीन उघडले आणि 9 लाख 55 हजार रुपयांची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले.

गॅस कटरच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांत या एटीएम मशीन उघडले आणि 9 लाख 55 हजार रुपयांची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले.

  • Published by:  sachin Salve
नितीन नांदूरकर, प्रतिनिधी जळगाव, 01 जून : जळगाव (jalgaon) जिल्ह्यातील कासोदामध्ये चोरट्यांनी एटीएम मशीन (ATM machine) फोडून चोरी केल्याची घटना समोर आली आहे. या चोरट्यांनी एटीएम मशीन कटरने फोडले आणि 9 लाखांची रोकड लंपास केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कासोदा येथील बिर्ला चौक परिसरात ही घटना घडली आहे. या चौकात असलेल्या युनियन बँकेचे एटीएम मशीन (ATM machine of Union Bank) आहे. चोरट्यांनी मध्यरात्री एटीएम मशीनमध्ये घुसले आणि गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन कापले. एटीएम मशीनमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊ नये म्हणून चोरट्यांनी तोंडावर रुमाल बांधलेला होता. (जूनमध्ये सूर्य, शुक्र आणि मंगळ बदलतील राशी, जाणून घ्या इतर ग्रहांची स्थिती) गॅस कटरच्या मदतीने अवघ्या काही मिनिटांत या एटीएम मशीन उघडले आणि 9 लाख 55 हजार रुपयांची रक्कम घेऊन चोरटे पसार झाले. सकाळी जेव्हा स्थानिक दुकानादार आले असताना त्यांना एटीएममशीन फोडल्याचे आढळून आले. त्यामुळे तातडीने या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनास्थळाची पाहिली करून पंचनामा केला. याबाबत कासोदा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. चोरट्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी शहरात नाकाबंदी केली आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. शेती उपयुक्त वस्तू चोरणाऱ्या 4 जणांना अटक दरम्यान, बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील खेडेगावांमध्ये बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांच्या विहिरीवरील पंप शेतीच्या मशागतीसाठी वापरात येणारी अवजारे चोरी करणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला होता. अखेर पोलिसांना या चोरट्यांना पकडण्यात यश आले आहे.   अक्षय बाळासो हुले, अक्षय लक्ष्मण घोलप, अभिषेक दत्तात्रय गावडे, संतोष जगन्नाथ खांडेकर यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.  विहिरीवरील पाणी उपसण्याचे इंजिन चोरीच्या गुन्ह्यांमध्ये त्यांना अटक करण्यात आली. आरोपीकडे 2 इंजिन आणि 11 पाण्यातील मोटार व एक शेतीच्या मशागतीसाठी वापरण्यात येणारा कल्टीवेटर  मिळून आले आहे. (Horoscope : आव्हानात्मक आहे उद्याचा दिवस; तुमच्या राशीनुसार पाहा तुमचं भविष्य) सदर वस्तूंची वाहतूक करण्यासाठी आरोपी अभिषेक गावडे यांच्या मालकीचा छोटा टेम्पो देखील पोलिसांनी जप्त केला आहे.  बऱ्याच दिवसापासून ही टोळी सक्रिय होती. शेतीमधील पाण्याचे पंप व शेती कामासाठी लागणारे अवजारे चोरी होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला होता.  सदर आरोपी यांच्यावरती बारामती तालुका पोलीस स्टेशन येथे भारतीय दंड विधान कलम 379 प्रमाणे 11 मोटार, 2 इंजिन व एक शेतीची मशागत करण्यासाठी वापरात येणारे कल्टीवेटर असे एकूण चोरीचे तब्बल 14 गुन्हे  दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यातील मुद्देमाल व छोटा टेम्पो आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे. त्याची एकूण रक्कम 7,07,000 इतकी आहे.
First published:

पुढील बातम्या