Home /News /astrology /

Daily Horoscope : आव्हानात्मक आहे उद्याचा दिवस; तुमच्या राशीनुसार पाहा तुमचं भविष्य

Daily Horoscope : आव्हानात्मक आहे उद्याचा दिवस; तुमच्या राशीनुसार पाहा तुमचं भविष्य

Horoscope 02 June 2022 : 02 जून आव्हानात्मक, ताणपूर्ण असा असेल. तुम्हाला कोणत्या समस्यांचा सामना करावा लागेल पाहा तुमचं राशिभविष्य.

सितारा - द वेलनेस स्टुडिओच्या संस्थापिका पूजा चंद्रा (Pooja Chandra, Founder, Citaaraa - The Wellness Studio www.citaaraa.co) प्रसिद्ध जोतिषतज्ज्ञ असून, त्यांनी आपल्या ओरॅकल स्पीक्स या सदराच्या माध्यमातून प्रत्येक राशीचं 2 जून 2022 या दिवसासाठीचं भविष्य सांगितलं आहे. मेष (Aries) (मार्च 21 ते एप्रिल 19) दिवस अगदी उत्साहपूर्ण आणि भरपूर कामाचा असणार आहे. नवनवीन प्रयोग करण्याची इच्छा होऊ शकते. मानसिक ताण-तणाव बाजूला ठेवा. LUCKY SIGN – A Vase वृषभ (Taurus) (एप्रिल 20 ते मे 20) तुमच्या मनातल्या भावना तुम्ही फार काळ लपवून ठेवू शकणार नाही. त्या व्यक्त करण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. तुम्ही आतापर्यंत केलेल्या चांगल्या कामाचं फळ आता तुम्हाला मिळेल. LUCKY SIGN - Roses मिथुन (Gemini) (21 मे ते 21 जून) पार्टनरशिपची एखादी ऑफर समोरून चालून आली असेल तर नक्की स्वीकारा. दिवसाच्या सुरुवातीला बराच ताण जाणवेल; मात्र संध्याकाळी आराम वाटेल. एखादी नवीन संकल्पना आकारास येण्यास वेळ लागेल. LUCKY SIGN – A Gift box कर्क (Cancer) (22 जून ते 22 जुलै) तुम्हाला भरपूर प्रसिद्धी मिळेल, ज्याचा भविष्यात अधिक कामं मिळवण्यासाठी किंवा बिझनेस आयडिया प्रत्यक्षात आणण्यासाठी फायदा होईल. काही बोलणी बऱ्याच काळापासून रखडली असली तर आज ती पूर्ण करा. LUCKY SIGN – A Sparrow सिंह (Leo) (23 जुलै ते 22 ऑगस्ट) एखादा चांगला शिक्षक वा प्रभावशाली व्यक्ती भेटू शकते जिची तुमच्यावर चांगलीच छाप पडेल. घरातल्या गोष्टी दिवसभर डोक्यात राहतील. वेळेचं नियोजन करणं अवघड जाईल. LUCKY SIGN – A Garden कन्या (Virgo) (23 ऑगस्ट ते 22 सप्टेंबर) काही दिवस अन्य दिवसांच्या तुलनेत अधिक आव्हानात्मक ठरतात. हा दिवसही असाच असेल; मात्र चिंता करण्याचं कारण नाही. दिवसाच्या सुरुवातीला तसं वाटलं तरी दुपारनंतर आराम मिळेल. LUCKY SIGN – A Selenite Crystal तूळ (Libra) (23 सप्टेंबर ते 23 ऑक्टोबर) कृपया छोट्या छोट्या गोष्टींचा ताण घेऊ नका. एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीबाबत अधिक माहिती घेण्याची गरज भासू शकते. तुमच्या जोडीदाराचं मत नक्की विचारात घ्या. LUCKY SIGN – A Carpet वृश्चिक (Scorpio) (24 ऑक्टोबर ते 21 नोव्हेंबर) तुमच्याकडे आकर्षित झालेली एखादी व्यक्ती लवकरच तुम्हाला भेटू शकते. येत्या काही दिवसांमध्ये कामाचा ताण वाढणार आहे; मात्र यादरम्यान एखादा दैवी अनुभव तुम्हाला बरेच दिवस आनंद देईल. LUCKY SIGN – A Clock धनू (Sagittarius) (22 नोव्हेंबर ते 21 डिसेंबर) तुमचा आळशीपणा लवकरच कमी केला नाही तर तो घातक ठरू शकतो. कृपया स्वतःला आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर काढा. कनिष्ठ सहकाऱ्यासोबत दिवसाचा बराच वेळ जाईल. LUCKY SIGN – A fine print मकर (Capricorn) (22 डिसेंबर ते 19 जानेवारी) तुमची महत्त्वाची कामं पूर्ण होण्याची शक्यता अगदी कमी आहे. बरीच कामं पुढे ढकलावी लागतील. नवीन नियमांचं पालन करणं आकर्षक वाटणार नाही. LUCKY SIGN – A Jute Basket कुंभ (Aquarius) (20 जानेवारी ते 18 फेब्रुवारी) दिवसाची सुरुवात थोड्या संथ गतीने होईल; मात्र दुपारनंतर गोष्टी वेग पकडतील. एखादा नातेवाईक महत्त्वाच्या कामासाठी वारंवार संपर्क साधेल. एखाद्या खास प्रसंगासाठी एखादी जागा बुक करण्याचा विचार करत असाल तर चांगला दिवस आहे. LUCKY SIGN – A Glass मीन (Pisces) (19 फेब्रुवारी ते 20 मार्च) भूतकाळातले काही प्रसंग वा घटना डोळ्यांसमोर आल्यामुळे भावनिक राहाल. मित्रांसोबत एखादी रोड ट्रिप प्लॅन करण्याची इच्छा होईल. कामाच्या ठिकाणी तुमचं बोलणं स्पष्ट ठेवा. LUCKY SIGN – A Photograph
First published:

Tags: Astrology and horoscope, Lifestyle, Rashibhavishya

पुढील बातम्या