मुंबई, 22 फेब्रुवारी : सध्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. दोन्ही गटाच्या वकिलांकडून न्यायालयात जोरदार युक्तिवाद सुरू आहे. यावर आता विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता सुप्रीम कोर्टात सुरू आहे. मी आपल्याला यापूर्वी देखील सांगितलेलं आहे की, आपल्या संविधानाने काही नियम तरतुदी घालून दिलेल्या आहेत. या नियमानुसार अपात्रते संदर्भातील निर्णय हे फक्त आणि फक्त विधानसभेचे अध्यक्षच घेऊ शकतात. जोपर्यंत विधानसभा अध्यक्ष या संदर्भातील निर्णय घेत नाही, तोपर्यंत इतर कुठल्याही यंत्रणेला त्यामध्ये हस्तक्षेप करता येत नसल्याचं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे. नेमकं काय म्हणाले नार्वेकर ? सध्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सुप्रीम कोर्टात सुरू आहे. यावर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी आपल्याला यापूर्वी देखील सांगितलेलं आहे की, आपल्या संविधानाने काही नियम तरतुदी घालून दिलेल्या आहेत. या नियमानुसार अपात्रते संदर्भातील निर्णय हे फक्त आणि फक्त विधानसभेचे अध्यक्षच घेऊ शरतात. जोपर्यंत विधानसभा अध्यक्ष या संदर्भातील निर्णय घेत नाही, तोपर्यंत इतर कुठल्याही यंत्रणेला त्यामध्ये हस्तक्षेप करता येत नाही. हेही वाचा : काही दिवसांनी पवार-पवार ओरडत रस्त्यावर दगड’…; मनसेचं संजय राऊतांना खोचक पत्र …तर याचिका दाखल करता येते विधानसभा अध्यक्षांनी निर्णय घेतल्यावर जर तो घटनाबाह्य असेल किंवा नियमबाह्य असेल तर या संदर्भात तुम्ही याचिका उच्च न्यायालयात किंवा सर्वोच्च न्यायालयात दखल करू शकता, न्याय मागू शकता. मात्र निर्णय होत नाही तोपर्यंत कोणत्याही न्यायालयाला यामध्ये हस्तेक्षेप करता येत नाही असे मला वाटते. तशीच भूमिका आज न्यायालयाने देखील घेतली. संविधानामधील तरतुदींचा आदर करणे क्रमप्राप्त असल्याचं नार्वेकर यांनी म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.