जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / अशोक चव्हाण काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत? चर्चांवर स्वतःच दिलं स्पष्ट उत्तर

अशोक चव्हाण काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत? चर्चांवर स्वतःच दिलं स्पष्ट उत्तर

अशोक चव्हाण काँग्रेसला रामराम ठोकण्याच्या तयारीत? चर्चांवर स्वतःच दिलं स्पष्ट उत्तर

अशोक चव्हाण (Ashok Chavan) पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात रंगल्या. मात्र अशोक चव्हाणांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

  • -MIN READ Nanded,Maharashtra
  • Last Updated :

नांदेड 01 ऑगस्ट : राज्यातील राजकारणात मागील काही दिवसांपासून अनेक मोठमोठ्या घडामोडी घडताना दिसत आहे. एकनाथ शिंदेंसह 50 आमदारांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळलं. या सरकारमध्ये आपल्यावर अन्याय झाल्याचा आरोप या आमदारांनी केला. मात्र, या घडामोडींपाठोपाठ आणखी एक चर्चा चांगलीच रंगलेली दिसली. ती म्हणजे काँग्रेस नेते अशोक चव्हाण पक्ष सोडणार असल्याची. यावर आता चव्हाणांनी स्वतःच उत्तर दिलं आहे. शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टाची पुन्हा नवी तारीख, सुनावणी लांबणीवर! अशोक चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार, आमदार प्रणिती शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेसचे विधानसभेतील तब्बल ११ आमदार बहुमत चाचणीदिवशी सभागृहात गैरहजर होते. यानंतर या आमदारांमध्ये नाराजी असल्याच्या चर्चा सुरू झाल्या. काँग्रेस हायकमांडनेही पक्षशिस्त मोडल्याच्या आरोपाखाली या ११ आमदारांवर कडक कारवाई करणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे, अशोक चव्हाण पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा राज्याच्या राजकारणात रंगल्या. मात्र अशोक चव्हाणांनी या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. मी असा कुठलाही निर्णय घेतला नाही, असं उत्तर त्यांनी दिलं. ‘हे अपेक्षित होतेच’, संजय राऊतांच्या अटकेनंतरही ‘सामना’तून राज्यपालांवर हल्लाबोल काँग्रेस नेते अशोक चव्हाण पक्ष सोडणार असल्याची जिल्हाभरात चर्चा आहे. मात्र, चव्हाण यांनी पक्ष सोडणार असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. चर्चेला काही महत्त्व नाही. असा कुठलाही निर्णय मी घेतला नाही, अशी प्रतिक्रिया देत अशोक चव्हाण यांनी याबाबत अधिक बोलणं टाळलं. बहुमत चाचणीच्या वेळी अशोक चव्हाण अनुपस्थितीत होते. त्यावरून काँग्रेस पक्षातूनच त्यांची कोंडी केली जात आहे, त्यामुळे अशोक चव्हाण नाराज असल्याचं म्हटलं गेलं. याच पार्श्वभूमीवर चव्हाण पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. मात्र ही चर्चा स्वतः अशोक चव्हाण यांनीच फेटाळून लावली आहे

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात