मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

महापौरांवरील टीका शेलारांना भोवणार? रुपाली चाकणकरांनी दिले पोलिसांना आदेश

महापौरांवरील टीका शेलारांना भोवणार? रुपाली चाकणकरांनी दिले पोलिसांना आदेश


मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका करताना भाजप नेते आशिष शेलार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका करताना भाजप नेते आशिष शेलार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका करताना भाजप नेते आशिष शेलार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते

पुणे, 07 डिसेंबर : मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून (worli blast case) आमदार आशिष शेलार (ashish shelar) यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mayor Kishori Pednekar)यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि भाजपमध्ये वाद पेटला आहे. आता या वादात राष्ट्रवादीच्या नेत्या आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (rupali chakankar) यांनी एंट्री केली आहे. आशिष शेलार यांचे विधान आक्षेपार्ह असल्याचे म्हणत पोलीस आयुक्तांना वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.

मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर टीका करताना भाजप नेते आशिष शेलार यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. या प्रकरणी शिवसेनेनं पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. तर दुसरीकडे आता खुद्ध राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे.

राज्य महिला आयोगाला स्त्रियावर होणाऱ्या अत्याचारबद्दल स्वत:हुन तक्रार घेण्याचा अधिकार आहे. यानुसार, आशिष शेलार यांनी किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल केले विधान हे अत्यंत अवमानकार आहे, त्याची राज्य महिला आयोगाने दखल घेतली आहे, अशी माहिती चाकणकर यांनी दिली.

Government Jobs: MPSC तर्फे 'या' पदांसाठी पदभरती जाहीर; लगेच करा अप्लाय

तसंच, या प्रकरणाबद्दल राज्य महिला आयोगाने नाराजी व्यक्त केली असून मुंबई पोलीस आयुक्तांना वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, अशी माहितीही रूपाली चाकणकर यांनी दिली.

लाखोंचं श्रद्धास्थान असलेल्या पंचवटीत पुजाऱ्यांमध्ये तुंबळ हाणामारी, भयानक थरार

दरम्यान, आशिष शेलार यांच्या विरोधात सेना महिला आघाडी पोलिसात तक्रार दाखल करणार आहे.  आशिष शेलार यांनी महापौर यांच्या विरोधात जे वक्तव्य केलं होत याच्याविरोधात तक्रार केली जाणार आहे.  कायदा सुव्यवस्था सहआयुक्त विश्वास नागरे पाटील यांच्याकडे तक्रार करणार आहे.  आशिष शेलार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करा अशी मागणी करणार आहे.  नगरसेविका विशाखा राऊत, मीनाताई कांबळे यांच्यासह मुंबईतील सर्व महिला विभाग प्रमुखांनी तसे पत्र दिले आहे.

शेलारांनी असं बोलायला नको हवं होतं - पेडणेकर

'पाच दिवसांपूर्वी मी विश्वास नागरे पाटील यांची भेट घेतली होती.  एका महिलेची फसवणूक झाली होती त्या प्रकरणात ही भेट मागितली होती. त्यामुळे आज विश्वास नागरे पाटील यांची भेट घेतली आहे. आशिष शेलार हे संवेदनशील आहेत. आम्ही एकत्र काम केलं आहे, त्यांनी असे शब्द वापरला पाहिजे नव्हता. ते काय बोलले हे मी ऐकलं नाही पण तुमच्या माध्यमातून कळलं, अशी प्रतिक्रिया किशोरी पेडणेकर यांनी दिली.

First published: