मराठी बातम्या /बातम्या /क्राईम /

पुजारी एकमेकांना भिडले, एकाने दुसऱ्यावर पिस्तूल रोखली, नाशिकच्या पंचवटीत भयानक थरार

पुजारी एकमेकांना भिडले, एकाने दुसऱ्यावर पिस्तूल रोखली, नाशिकच्या पंचवटीत भयानक थरार

त्रंबकेश्वरमध्ये होत असलेल्या विविध पूजेवरुन पुन्हा पुरोहितांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण सात जणांना अटक केली आहे.

  • Published by:  Chetan Patil

नाशिक, 7 डिसेंबर : नाशिकच्या पंचवटी (Panchavati) येथे पुराणकाळातलं मंदिर आहे. तिथे कुंभमेळा (Kumbhmela) भरवतो. दररोज हजारो पर्यटक पंचवटीला भेट देतात. पण लाखो भक्तांचं श्रद्धास्थान असलेल्या याच पंचवटीत एक विचित्र घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे पंचवटी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये पुरोहित किंवा पुजाऱ्यांचं वास्तव असतं. भाविक त्यांना वंदन करुन त्यांचे आशीर्वाद घेतात. त्यांच्या सुचनेनुसार विविध पुजा-आस्था करतात. पण पंचवटी इथे घडलेल्या घटनेमुळे भाविकांचं मन दुखावलं आहे. कारण पंचवटीत पुजारींच्या (Pujari) दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी (Dispute) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे या गदारोळादरम्यान एका पुजाऱ्याने थेट पिस्तूल (Pistule) बाहेर काढल्याचीदेखील माहिती समोर आलीय. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. पुजाऱ्याकडे पिस्तूल कशी आली? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

नेमकं काय घडलं?

त्रंबकेश्वरमध्ये होत असलेल्या विविध पूजेवरुन पुन्हा पुरोहितांच्या दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणात पोलिसांनी दोन्ही गटातील एकूण सात जणांना अटक केली आहे. त्र्यंबकेश्वरला विधी करण्यासाठी यजमान पळविल्याने नाशिकच्या पंचवटी परिसरातील हिरावडी येथे दोन पुजाऱ्यांमध्येच हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे. यावेळी एका पुजाऱ्याने स्वतःकडे असलेला गावठी कट्टाच दुसऱ्या पुजाऱ्यावर रोखला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली.

हेही वाचा : Shocking! मॉलमध्ये महिलेचं किळसवाणं कृत्य; VIDEO पाहूनच संताप येईल

सात संशयितांना बेड्या

या प्रकरणी सात संशयितांना पंचवटी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. त्र्यंबकेश्वरला पूजा विधी करण्यासाठी आलेल्या यजमानांना पळविल्याच्या कारणावरुन ही घटना घडल्याची माहिती आहे. यावेळी गस्तीवर असलेल्या पोलिसांनी तात्काळ अतिरिक्त पोलीस कुमक बोलावून हस्तक्षेप करत ही हाणामारी रोखली. तर पुजाऱ्यांच्या मोटारीची पोलिसांनी झडती घेतली असता कारमधून एक गावठी कट्टा आणि 11 जिवंत काडतुसे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करत आहेत.

First published: