जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / Shirdi News: आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिर्डीतही भक्तांची मांदियाळी! भाविकांसाठी 12 टन खिचडीचा प्रसाद

Shirdi News: आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिर्डीतही भक्तांची मांदियाळी! भाविकांसाठी 12 टन खिचडीचा प्रसाद

आषाढी एकादशी साईबाबा संस्थान खिचडी वाटप

आषाढी एकादशी साईबाबा संस्थान खिचडी वाटप

Shirdi News: आज आषाढी एकादशी निमित्त राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान विविध विठ्ठल मंदिरात आज भक्तांनी गर्दी केली. यासोबतच शिर्डीमध्येही भक्तांची मांदियाळी पाहायला मिळतेय.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

हरीष दिमोटे, शिर्डी : भेटी लागी जीवा, लागलीस आस… असं म्हणत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल भक्त मंदिरांमध्ये गर्दी करतात. पंढरपुरात तर आज विठ्ठल भक्तांचा पूर आला आहेच. यासोबतच राज्यातील विविध मंदिरांमध्ये देखील भाविक विठ्ठल नामाच गरज करताना दिसताय. शिर्डीतील साईबाबांच्या मंदिरातही दरवर्षी प्रमाणे यंदाही भाविकांची मांदियाळी पाहायला मिळतेय. सबका मालिक एक असा संदेश देणाऱ्या साई बाबांच्या दर्शनासाठी भक्तांनी रांगा लावल्या आहेत. शिर्डी हेच माझे पंढरपूर असं म्हणत हजारो साई भक्त हे शिर्डीमध्ये दाखल झाले आहेत. दरम्यान आज आषाढी एकादशीचे निमित्त साई प्रसादालयामध्ये भावाकांसाठी साबुदाणा खिचडीचा महाप्रसाद ठेवण्यात आलाय. PHOTOS: मुख्यमंत्र्यांकडून विठ्ठलाची शासकीय महापूजा, पहा विठ्ठल-रुक्मिणी मूर्तीची आकर्षक सजावट शिर्डीत साईदर्शनासाठी येणारे भाविक आज प्रसादालयात शाबुदाणा खिचडीचा आस्वाद घेत आहेत. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आज प्रसादालयात तब्बल 12 टनापेक्षा जास्त खिचडी बनवली जातेय. सकाळपासून भाविक प्रसादाचा आनंद घेताहेत. गेल्यावर्षी तब्बल अंशी हजार भाविकांनी खिचडी प्रसादाचा लाभ घेतला होता. यावर्षी देखील तेवढेच भक्त येतील असा अंदाज आहे. यामुळे साईबाबा संस्थानने तशी तयारी ठेवली आहे. कारण शिर्डी पंचक्रोशीतील स्थानिक भाविक हे आजच्या दिवशी आवर्जुन प्रसादाच्या खिचडीचा आस्वाद घेण्यासाठी गर्दी करतात. यासोबतच देशभरातील हजारो भाविकही येथे दर्शनासाठी रांगा लावत असतात. Kolhapur News : उपवासासाठी फक्त 2 मिनिटात घरच्या घरीच बनवा चविष्ट साबुदाणा वडा, पाहा सोपी रेसिपी आषाढी एकादशीच्या निमित्ताने शिर्डीतील साई मंदिरामध्ये देखील विशेष सजावट केली जाते. यासोबतच विठ्ठलाची प्रतिमा ठेवून त्यांचंही पूजन येथे केलं जातं. फुलांच्या सुंदर सजावटीसह तुळशी माळांनी साईंची मुर्ती ही सजवली जात असते. यंदाची आकर्षक सजावत करण्यात आली आहे. कारण भक्त हे आपल्या साईबाबांमध्ये विठ्ठलाला शोधत असतात. यामुळेच शिर्डी माझे पंढरपूर असं म्हणत हजारो साई भक्त आजच्या दिवशी दर्शनासाठी रांगा लावतात. आजही सकाळपासून हजारो भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेत साबुदाणा खिचडीच्या प्रसादाचा आस्वाद घेतला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात