मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गणपतीच्या सुट्टीसाठी गावी आले अन् गळफास घेऊन जवानाने संपवलं आयुष्य, सातारा हादरलं

गणपतीच्या सुट्टीसाठी गावी आले अन् गळफास घेऊन जवानाने संपवलं आयुष्य, सातारा हादरलं

मुळचे वाई तालुक्यातील व्याजवाडी गावातील विजय सुदाम कुदळे हे सैन्यात आयटीबिपीमध्ये कर्तव्य बजावत होते.

मुळचे वाई तालुक्यातील व्याजवाडी गावातील विजय सुदाम कुदळे हे सैन्यात आयटीबिपीमध्ये कर्तव्य बजावत होते.

मुळचे वाई तालुक्यातील व्याजवाडी गावातील विजय सुदाम कुदळे हे सैन्यात आयटीबिपीमध्ये कर्तव्य बजावत होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Satara, India

सातारा, 24 सप्टेंबर : सातारा जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. सुट्टीवर आलेल्या सैनिकांची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. जवानाच्या आत्महत्येमुळे गावामध्ये खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय सुदाम कुदळे असं या जवानाचं नाव आहे. मुळचे वाई तालुक्यातील व्याजवाडी गावातील विजय सुदाम कुदळे हे सैन्यात आयटीबिपीमध्ये कर्तव्य बजावत होते. गणपतीसाठी विजय कुदळे हे साताऱ्यात आपल्या गावी सुट्टीवर आले होते. विजय कुदळे हे आपली रजा संपवून ड्युटीवर जाणार होते. पण त्यापूर्वी साताऱ्यातील अमरलक्ष्मी येथील प्रेरणा सोसायटीमध्ये शुक्रवारी संध्याकाळी छताच्या हुकाला ओढणीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली. घटनेची माहिती मिळता पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला आहे.

(शाळा सुटली अन् 13 वर्षांची श्रद्धा जीवाला मुकली, घरी येताना ट्रॅक्टरखाली सायकल सापडली)

विजय कुदळे यांनी आत्महत्या कोणत्या कारणातून केली हे समजू शकले नाही. सातारा शहर पोलीस ठाण्यात याबाबत नोंद करण्यात आली आहे. याबद्दलचा अधिक तपास सातारा शहर पोलीस करत आहेत.

औरंगाबादचे बिल्डर अनिल आग्रहारकर आत्महत्येप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

दरम्यान, औरंगाबाद शहरातील प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक तथा क्रेडाईचे कोषाध्यक्ष अनिल आग्रहारकर यांनी बुधवारी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याने बांधकाम व्यवसायिकांमध्ये खळबळ उडाली होती. याप्रकरणी त्यांच्या भावाने जवाहर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार शहरातील प्रॉपर्टी डीलर भागवत चव्हाण यांच्याविरुद्ध आत्महतेस प्रवृत्त केल्याचा गुन्हा जवाहर नगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

(तुळजाभवानीच्या दारातून 18 मुलांची सुटका, भिक मागताना आले आढळून!)

आरोपी हा आग्रहाकर यांना 30 कोटी रुपयांचे लोन देणार होते. त्यासाठी त्यांनी 68 लाख रुपये घेतले होते. पैसे घेऊनही कर्ज मिळवून दिले नाही त्यामुळे अडचणीत आलो आहे. या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत आहे, असे आग्रहाकर यांनी त्यांच्या डायरीमध्ये नोंद करून ठेवल्याचे त्यांच्या भावाने सांगितले आहे. तसंच, मागील आठ ते दहा दिवसांपासून आग्रहारकर यांना व्यावहारिक त्रास असल्याची परिवाराने माहिती दिली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहे.

First published: