मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शाळा सुटली अन् 13 वर्षांची श्रद्धा जीवाला मुकली, घरी येताना ट्रॅक्टरखाली सायकल सापडली

शाळा सुटली अन् 13 वर्षांची श्रद्धा जीवाला मुकली, घरी येताना ट्रॅक्टरखाली सायकल सापडली

 नेहमीप्रमाणे श्रद्धा शाळेत गेली होती. संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर ती घरी परत येत होती.

नेहमीप्रमाणे श्रद्धा शाळेत गेली होती. संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर ती घरी परत येत होती.

नेहमीप्रमाणे श्रद्धा शाळेत गेली होती. संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर ती घरी परत येत होती.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India
  • Published by:  sachin Salve

अविनाश कानडजे, प्रतिनिधी

औरंगाबाद, 24 सप्टेंबर : शाळेतून घरी जाण्यासाठी सायकलवर निघालेल्या 13 वर्षीय मुलीचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कन्नड तालुक्यातील पानपोई फाट्या नजीक शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली. श्रद्धा सोमीनाथ पिंपळे असं या 13 वर्षीय चिमुकलीचे नाव आहे. श्रद्धा पिंपळेही सातव्या वर्गात शिकत होती.

नेहमीप्रमाणे श्रद्धा शाळेत गेली होती. संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर ती घरी परत येत होती. पाणपोई फाट्या जवळील बनशेंद्रा शिवारातील बहिरगाव डोणगाव रोडवर शाळेतून सायकलवरून घरी येत असताना अचानक एका भरधाव ट्रॅक्टरने तिला धडक दिली. धडक बसल्यामुळे श्रद्धा चाकाखाली आल्याने गंभीर जखमी झाली होती.

(जिवंत समजून दीड वर्ष मृतदेहासोबत एकाच घरात राहिलं कुटुंब; असा झाला खुलासा)

उपस्थितीत लोकांनी तातडीने श्रद्धाला नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन गेले. पण तिला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. 13 वर्षांच्या श्रद्धाचा अपघातील मृत्यू झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पैठणजवळ स्कूल बस-दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीस्वार जागेवरच ठार

दरम्यान, औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील निलजगाव ते पाडळी रोडवर मोटारसायकल आणि स्कूल बसची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार जागीच ठार झाला आहे. नवनाथ भरत भादे, (वय ३५ वर्षे, रा.पाडळी ता पैठण) असे मोटारसायकल स्वाराचे नाव आहे. पोरगाव फाटा येथील एका शाळेची स्कुल बस ही पोरगाव येथून बिडकिनच्या दिशेने येत होती, तर मोटारसायकल स्वार हा निलजगावकडून पाडळीकडे जात असताना हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. यावेळी निलजगाव आणि पाडळी रोडवर नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती.

First published: