कोल्हापूर, 27 सप्टेंबर: जेवणावरुन वाद झाल्यानं वडिलांनी मुलाला मारलं. याच रागातून संतापलेल्या मुलानं वडिलांच्या छातीत कात्री भोसकूम खून केला. उचगाव (जि. कोल्हापूर) इथल्या मणेरमाळ परिसरातील इंद्रजीत कॉलनीत रविवारी दुपारी ही धक्कादायक घटना घडली. चंद्रकांत सोनुले (वय-48) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव आहे. ज्ञानेश्वर सोनुने (वय- 22) असं आरोपी मुलाचं नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे.
हेही वाचा...भाजपच्या सरचिटणीसाचं वादग्रस्त वक्तव्य; कोरोना झाला तर ममतांना मिठी मारेन
मिळालेली माहिती अशी की, करवीर तालुक्यातील उचगाव इथल्या मणेरमाळ परिसरातील इंद्रजीत कॉलनीत चंद्रकांत भगवान सोनुले आपल्या कुटुंबासह भाड्याच्या घरात राहत होते. चंद्रकांत हे पेंटर म्हणून काम करत होते तर मुलगा ज्ञानेश्वर हा काहीच कामधंदा करत नव्हता. रविवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान बापलेक जेवायला बसले होते. जेवण रताना बापलेकात वाद झाला. दोघांमधील वाद विकोपाला गेला. वडील चंद्रकांत यांनी ज्ञानेश्वरला तांब्या फेकून मारला. राग अनावर झाल्यानं संतापलेल्या ज्ञानेश्वरनं शेजारी पडलेल्या कात्री घेतली आणि वडिलांच्या छातीच भोसकली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या चंद्रकांत पाटील यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यु झाला.
या घटनेची माहीती मिळताच करवीर डीवायएसपी प्रशांत अमृतकर यांनी भेट देवून पुढील कारवाईच्या पोलिसांना सूचना दिल्या. गांधीनगर पोलीस ठाण्याचे सपोनि दीपक भांडवलकर हे कर्मचाऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांना आरोपी ज्ञानेश्वरला अटक केली आहे.
मटण कापण्याच्या सुऱ्यानं जन्मदात्या बापावर केले सपासप वार
भिवंडी शहरातील कामतघर परिसरात देखील अशीच घटना घटली आहे. एका तरुणानं आपल्या वडिलांवर मटण कापण्याच्या सुऱ्यानं सपासप वार करून त्यांची हत्या केली आहे. गुरुनाथ पाटील (वय- 68 ) असं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव असून ते शिवसेनेचे माजी शाखाप्रमुख होते. धक्कादायक म्हणजे गुरूनाथ पाटील यांनी हत्या पोटच्या मुलानं केली आहे. हे हत्याकांड कौटुंबिक वादातून झाल्याची माहिती मिळाली आहे. ब्रिजेश पाटील असं हत्या करणाऱ्या मुलाचं नाव असून त्याला नारपोली पोलिसांनी अटक केली आहे.
गुरुनाथ पाटील हे आपल्या घरात झोपले असताना ब्रिजेश याने मटण कापण्याच्या सुऱ्यानं वडिलांच्या मान आणि तोंडावर सपासप वार केले. यात गुरुनाथ पाटील यांचा जागेवरच मृत्यू झाला. गुरुनाथ पाटील यांचे त्यांच्या मुलांसोबत वर्षभरापासून कौटुंबीक वाद होते. त्याबाबत गुरुनाथ पाटील यांनी वेळोवेळी नारपोली पोलिसांकडे मुलाविरोधात तक्रार केली होती. परंतु पोलिसांना आरोपी मुलाला त्याबाबत अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून त्याला सोडून दिलं होतं. त्याच मुलानं गुरूनाथ पाटील यांची आज हत्या केली आहे.
नारपोली पोलिसांनी हत्येच्या घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहेय दरम्यान, पोलिसांनी आरोपी मुलगा ब्रिजेश पाटील याला अटक केली असून त्याच्या विरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा...बापरे! कार चालवताना Glove Box मधून बाहेर आला भलामोठा साप; मग काय झालं पाहा VIDEOपोलिसांनी वेळीच दखल घेतली असती तर...
गुरूनाथ पाटील यांनी मुलाविरोधात नारपोली पोलिसांत वारंवार तक्रार केली होता. मात्र, पोलिसांनी आरोपी ब्रिजेश याच्या विरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करून त्याला सोडून दिलं होतं. पोलिसांनी आरोपीवर गंभीर कारवाई केली असती तर आज ही दुर्दैवी घटना घडली नसती, अशी प्रतिक्रिया स्थानिक नगरसेवक माजी उपमहापौर मनोज काटेकर यांनी दिली आहे. दरम्यान, कामतघर परिसात शिवसेना पक्षाच्या विकासासाठी गुरुनाथ पाटील यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.